Satara News: एका चिठ्ठीनं राखली सत्ता; शरद पवार गटाचा शिंदे गटाला धक्का

Shri Somaidevi Cooperative Society Election:चार उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर चिठ्ठीने निर्णय
Satara News
Satara News Sarkarnama
Published on
Updated on

Satara Politics: राज्यात राजकीय वातावरण गटा-तटात विभागू लागले असून शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही अजित पवार आणि शरद पवार गटात विभागला गेल्याने ताकद कमी झाली आहे.

पाटण विधानसभा मतदार संघात पाटणकर (शरद पवार गट) आणि देसाई (शिवसेना शिंदे गट) यांच्यात पारंपारिक लढत पाहायला मिळते. या मतदार संघात स्थानिक निवडणुका ते विधानसभा, लोकसभा असो येथे गटातटाचे राजकारण दिसते. याच ठिकाणी पाणी पुरवठा संस्थेच्या निवडणुकीत चार उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर चिठ्ठीने निर्णय घेण्यात आला. यात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील निसरे येथील श्री सोमाईदेवी सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणूक अटीतटीची झाली. पारंपारिक राजकीय विरोधक देसाई आणि पाटणकर (शरद पवार गट) यांच्यात लढत झाली. निसरे तालुका पाटण येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या श्री सोमाईदेवी शेतकरी विकास पॅनेलचा 7 विरुद्ध 6 ने विजय झाला. या निकालाने पाटणकर गटाची सत्ता अबाधित राहिली असून, देसाई गटाने दिलेली कडवी झुंज मात्र अयशस्वी ठरली आहे.

Satara News
JACA Scam: हेमंत सोरेन यांच्यानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री ED च्या रडारवर

पाणीपुरवठा संस्थांमधील नामांकित संस्था म्हणून निसरे गावची श्री सोमाईदेवी सहकारी पाणीपुरवठा संस्था ओळखली जाते. या संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची होऊन त्यामध्ये माजी मंत्री पाटणकर गटाचे सात व मंत्री देसाई गटाचे सहा सदस्य निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद गुरव यांनी काम पाहिले. श्री सोमाई देवी सहकारी पाणीपुरवठा संस्थेसाठी 327 इतके मतदान झाले होते. यामध्ये 13 मतपत्रिका बाद झाल्या. या संस्थेचे कार्यक्षेत्र निसरे, आबदारवाडी, गिरेवाडी असे असून, 350 एकर क्षेत्र असलेल्या गावांमध्ये एकूण 565 सभासद आहेत. या झालेल्या निवडणुकीत प्रथमच अटीतटीची लढत पाहावयास मिळाली.

चार उमेदवारांना 157 मते 

पाटण पाणीपुरवठा सहकारी तालुक्यातील या निवडणुकीत चार उमेदवारांना 157 अशी समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीवर दोन उमेदवार विजयी झाले. या चिठ्ठीद्वारे पाटणकर गटाला आपले अस्तित्व अबाधित राखता आले असले, तरी या कौलामुळे दोन गट समान अंतरावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. 13 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन जागा पाटणकर गटाने बिनविरोध जिंकल्या होत्या. त्यानंतर दोन जागा चिठ्ठीद्वारे विजयी झाल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत पहायला मिळाली.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com