शंकरराव गडाख म्हणाले, हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट

मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांच्या स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर काल ( शुक्रवारी ) जीवघेणा हल्ला झाला.
Shankarrao gadakh
Shankarrao gadakhSarkarnama

सोनई (अहमदनगर) - राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांच्या स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर काल ( शुक्रवारी ) जीवघेणा हल्ला झाला. हल्ल्यातील सूत्रधार हा भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा नेवासे तालुक्यात आहे. या संदर्भात मंत्री शंकरराव गडाख यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ( Shankarrao Gadakh said, this attack is a plot to eliminate me from politics )

काल (शुक्रवारी) रात्री 9.45 वाजता घोडेगाव-लोहगाव रस्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी मंत्री गडाखांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गावठी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या होत्या. पैकी दोन गोळ्या कमरेच्या खाली लागल्या होत्या. जखमी राहुल राजळे यांचे बंधू विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shankarrao gadakh
मंत्री गडाखांच्या स्वीय सहाय्यकावर बेछूट गोळीबार

मंत्री गडाख म्हणाले, स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेला हल्ला माझे राजकारण संपविण्यासाठीच केला आहे. नेवासे तालुक्यातील राजकीय विरोधकांनी हा हल्ला एक प्रकारे माझ्यावरच केला आहे.

मंत्री गडाख पुढे म्हणाले, की नेवासे तालुक्यातील स्थानिक विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचून मला राजकारणातून संपविण्याचा जणू विडाच उचलला आहे. अनेक दिवसांपासून खालच्या पातळीवर आरोप, शिवराळ भाषणे, खोट्या, नाट्या केसेस दाखल केल्या. आता तर माझ्या स्वीय सहाय्यकावर खुनी हल्ला करण्यात आला आहे, असे सांगून माझा पोलिस यंत्रणा, न्यायदेवता व जनता जनार्धनावर विश्वास आहे. या घटनेतून लवकरच सत्य बाहेर येईल, असा विश्वास गडाख यांनी आपल्या प्रतिक्रियेत व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com