शरद पवार- नितीन गडकरी दिसणार एका मंचावर

महाराष्ट्र भरातील शिवसेना-भाजप ( Shivsena-BJP ) नेत्यांच्या जवळीकीमुळे अनेक राजकीय आडाखे बांधले जात आहेत.
Sharad Pawar & Nitin Gadakari
Sharad Pawar & Nitin GadakariSarkarnama
Published on
Updated on

नगर : राज्यभरात शिवसेना-भाजप नेत्यांच्या जवळीकीमुळे अनेक राजकीय आडाखे बांधले जात आहेत. महाविकास आघाडीविषयी राजकीय मतमतांतरे होत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आल्यापासून या राजकीय चर्चा सुरू झाल्या. आता महाराष्ट्रातील दोन राजकीय दिग्गज अहमदनगरमध्ये एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी शनिवारी रस्ता कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी नगरला येत आहेत. केडगाव जवळील सोनेवाडी रस्त्यावर होणाऱ्या कार्यक्रमात एकत्र असतील. गडकरी यांच्या पुढाकाराने सुमारे 4 हजार कोटी रुपयांची रस्त्याची कामे होत आहेत अशी माहिती भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिली. यावेळी सुनील रामदासी, सचिन पारखी, विवेक नाईक, तुषार पोटे उपस्थित होते.

Sharad Pawar & Nitin Gadakari
शरद पवार हे शेतकऱ्यांचे नव्हे तर, साखर सम्राट, कारखानदारांचे नेते

नगर जिल्ह्यात शरद पवार व नितीन गडकरी या दोन मातब्बर नेत्यांसह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत. त्यामुळे कार्यक्रम विकासात्मक असला तरी या कार्यक्रमाकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. नगर- करमाळा-टेंभुर्णी या चारपदरी रस्त्याचे 80 किलोमीटर काम होत असून त्यासाठी 2 हजार 12 कोटी रुपये खर्च होत आहेत. सावळी विहीर ते अहमदनगर बायपास या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 496 कोटी रुपये खर्च होत असून हा 80 किलोमीटरचा रस्ता आहे. अहमदनगर आणि भिंगार असा 18 किलोमीटरचा रस्ता रुंदीकरण होत असून त्यासाठी 35 कोटी रुपये तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामांसाटी 84 कोटी रुपये खर्च होत आहे. या कामाचे भूमिपूजन होत आहे.   

Sharad Pawar & Nitin Gadakari
शरद पवार यांचे नाव घेण्याची लायकी नाही; हसन मुश्रीफ

अहमदनगर - दौंड- वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर - कडा - आष्टी - जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदुर शिंगोटे- ते कोल्हार रस्ता मजुबतीकरण व कोपरगाव - वैजापूर रस्ता मजबुतीकरण कामे पूर्ण झाली आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा होत आहे. एकूण 4 हजार 74 कोटी रुपयांची ही कामे आहे. केडगाव जवळील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथे मुख्य व एकत्रित हा कार्यक्रम होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी शनिवारी रस्ता कामाचे भूमिपूजन व लोकार्पन होत असून माजी केंद्रीय कृषिमंत्री  व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे व सदाशीव लोखंडे, महापौर रोहिनी शेंडगे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत असे गंधे यांनी सांगितले.

कार्यक्रम विकासात्मक आहे. मात्र नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच मातब्बर व सर्व पक्षीय प्रमुख नेते एकत्र येत आहे. सध्याचा राजकीय पाश्वभूमीचा विचार करता या कार्यक्रमाकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com