Sharad Pawar News : राजभवनात पहाटेच्यावेळी (early morning swearing controversy) देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी झाला होता. तीन वर्षांनंतरही या पहाटेच्या शपथविधीची आठवण अनेकदा राजकीय मंडळी करुन देत आहेत. (Sharad pawar reaction early morning swearing controversy news)
तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यावर जयंत पाटलांनी स्पष्टीकरणही दिले. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी भाष्य केले आहे. ते आज (शनिवारी) कोल्हापुरात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटे झालेल्या शपथविधीमागे पवार असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला होता. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचे पाटील म्हणाले होते.
यावर पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नावर बोलण्यास टाळले. "पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे तो प्रश्न आता कशाला काढायचा,?" असे शरद पवार म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. "शरद पवार भाजपचे आहेत," असे आंबेडकर म्हणाले आहेत. यावरुन अनेक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
यावर पवार म्हणाले, "वंचित बहुजन आघाडीची ठाकरेंच्या शिवसेनेशी युती झाली आहे. वंचितसोबत आघाडीचा प्रस्ताव आमचा नाही, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही," 'ठाकरे गट आणि वंचित यांच्यात वाद आहे का मला माहित नाही,'असे पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील, असे इंडिया टूडे –सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात समोर आले आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, " हे सर्वेक्षण दिशा दाखवणारे आहे. ही आकडेवारी खरं चित्र दाखवणारी आहे. पण बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यासोबत राहणार नाही. हे सर्वेक्षण राज्य सरकारची चिंता वाढविणारे आहे,"
"निवडणुका आल्यानंतर फोडाफोडी सुरु होते. अद्याप कुठल्याही जागावाटपाबाबत चर्चा नाही. लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होईल की नाही, हे आता सांगता येत नाही, " असे पवार म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस व अजित पवार यांचा राजभवनात पहाटेच्यावेळी शपथविधी झाला होता. ही शरद पवारांची खेळी असू शकते. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. शपथविधीची ही खेळी ही कुणीतरी जाणिवपूर्वक खेळली असे म्हणता येणार नाही. पण त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट मागे घेण्यास मदत झाली. त्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आणखी मजबूत झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.