Shashikant Shinde VS Mahesh Shinde : घोटाळा केला असता तर आता भाजपमध्ये असतो; शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना टोला

Satara Lok Sabha Constituency : शरद पवारांवर टीका केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील जनता इतिहास घडवते, हे महाराष्ट्राने पाहिले आहे, असे म्हणत शशिकांत शिंदेंनी पवारांवरील टीका सहन करणार नसल्याचा इशारा महेश शिंदेंना दिला आहे.
Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama

Satara Political News : मुंबई बाजार समितीत २०१४ साली चार हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. यात तत्कालीन संचालक शशिकांत शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप आमदार महेश शिंदेंनी केला आहे. महेश शिंदेंच्या या आरोपाला शशिकांत शिंदेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. हजारो कोटींचा घोटाळा केला असता तर मी आज भाजपमध्ये गेलो असतो, असा पलटवार शशिकांत शिंदेंनी केला आहे.

शशिकांत शिंदे Shashikant Shinde म्हणाले, आमदार महेश शिंदे हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराच्या चौकटीत बसतात का, हा माझा पहिला प्रश्न आहे. हा यशवंत विचाराचा असलेला सातारा जिल्हा अशा लोकांच्या हातात जाऊ नये, म्हणून माझी उमेदवारी दिली आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीच्या चौकटीत आम्ही शंभर टक्के काम करतोय. कुणी कितीही प्रयत्न करू द्या, यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची लढाई नक्की यशस्वी होईल, असा विश्वास शशिकांत यांनी व्यक्त केला.

माझ्या उमेदवारीमुळे त्यांच्या पायाखाली वाळू सरकली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत माझा चार हजार कोटीचा घोटाळा असता, तर मी भाजपमध्ये गेलो नसतो का?, असा टोला लगावत शिंदे यांनी माझ्याकडून कोणताही घोटाळा झालेला नाही, असे वारंवार सांगत आहे, याकडेही लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार महेश शिंदेंनी Mahesh Shinde ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. यावर शशिकांत शिंदेंनी, शरद पवारांवर टीका केल्यावर काय होते, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे. आमदार महेश शिंदेंनी पत्रकार परिषदेत पवारांवर जोरदार टीका केली. बापाला विसरण्याची पद्धत काही लोकांकडे असते. त्यामुळे मी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करणार नाही. मी सगळे सहन करीन, परंतु शरद पवारांवर बोलल्यावर जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे, असा इशाराही शशिकांत शिंदेंनी दिला.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Prithviraj Chavan : नेते, अभिनेते आणि उद्योगपतींशी पंतप्रधान मोदींनी तोडपाणी केलं; पृथ्वीराज चव्हाणांचं वर्मावर बोट

आपण आपल्या लायकीमध्ये राहावे. हा सातारा Satara जिल्हा पवारावर कोण बोलले तर इतिहास घडवतो. त्यांच्यावर टीका केल्यावर काय होते हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे. या निवडणुकीत अशाच प्रकारे टीका केली तर सातारा जिल्ह्यातील जनता शरद पवारांचा Sharad Pawar आणि यशवंतराव चव्हाण यांचे विचार कसे घेतात हे दाखवून देतील. याचा फायदा आम्हालाच होईल, असा विश्वासही शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Madha Loksabha : माढ्याच्या उमेदवारीचा शब्द शरद पवारांनी ऐनवेळी फिरवला; लक्ष्मण हाकेंचा आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com