Satara NCP News: पुणे येथील कल्याणीनगर अपघातानंतर अनेक घटना घडल्या आहेत. ससून हॉस्पिटलमधील प्रकाराला सध्याचे सरकारच जबाबदार असून सक्तीच्या रजेवर असलेले डॉक्टर ट्रीटमेंट करतात, रक्ताचे नमुने तपासतो, याचा अर्थ त्यांना सरकारचा धाकच राहिलेला नसावा. याबाबतची चौकशी समितीची नेमणूक हा केवळ फार्स असून यापूर्वी घडलेले ललित पाटील प्रकरण आणि आत्ताच्या अगरवाल प्रकरणात फार मोठी डील झालेली आहे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
यात सरकारमधील एका प्रमुख मंत्र्यांचा हात आहे. याचा खुलासा सरकारच्या प्रमुखाने करावा, अशी मागणी उचलून धरत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी शुक्रवारी (ता.31) पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, डॉ. तावरे याला पुन्हा पदावर बसविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील एका आमदारने शिफारस केली होती, असा गौप्यस्फोट करुन त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले, पुणे येथील ससूनमध्ये गेली काही दिवस जे काही घडत आहे, त्याला सरकारच जबाबदार आहे. या घटनेत सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळेच हे घडले आहे. सक्तीच्या रजेवर असलेल्या डॉक्टरने ट्रीटमेंट केली असून रक्ताचे नमुने ही तोच तपासतो. कारण सरकारची यांना भीती किंवा धाकच राहिलेला नाही. या प्रकरणात नेमलेली चौकशी समिती हा फार्स असून याचा खुलासा सरकारने करावा.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ससूनमध्ये किडनी रॅकेटबाबत ज्या अधिकाऱ्यांची नावे आली होती, तेच अधिकार येथे पुन्हा आणले गेले आहेत. त्यासाठी कोणाची शिफारस होती. निवृत्त न्यायमूर्तीच्या माध्यमातून चौकशी झाली. त्याचा अहवाल येण्याआधीच रुबी हॉस्पिटलला परवाना परत केला आहे. हा परवाना नूतनीकरण कोणाच्या सांगण्यावरुन केला. यामध्ये कोणत्या मंत्र्यांचा हात होता, असं आव्हानही सरकारला शिंदे यांनी दिले.
डॉ. तावरे यांना कोणत्या मंत्र्यांने पुन्हा आणले, त्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोणत्या आमदाराने शिफारस केली, हे उघड होणे गरजेचे आहे. या सर्व प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे. अगदी ललित पाटील प्रकरणापासून ते कालच्या प्रकरणापर्यंत फार मोठे डिल झाले आहे. याची चौकशी करावी, यासाठी आम्ही सीबीआय(CBI) चौकशीची मागणी केली आहे. रुबी हाॅस्पिटलचा परवाना कोणी नुतनीकरण केला, तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना पुन्हा परत का बसविले, याची जबाबदारी घेऊन सरकारमधील प्रमुख मंत्र्याने राजीनामा द्यावा असंही शिंदे यांनी सांगितले.
माणसांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. याची चौकशी करण्याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही या विरोधात आवाज उठविणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. हे प्रकरण आम्ही विधानपरिषदेत, विधानसभेत आणि लोकसभेतही लावून धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.