Shashikant Shinde : 'महाविकास आघाडी महाराष्ट्रात 30 ते 35 जागा जिंकेल', शिंदेंना ठाम विश्वास

Shashikant Shinde Vs Udayanraje Bhosale : जनतेने स्वत:च्या हातात ही निवडणूक घेतली होती. त्यामुळे लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानानंतर भाजपच्या लक्षात आले की आपल्या जागा कमी होत आहे, असे शिंदे म्हणाले.
Shashikant Shinde
Shashikant Shindesarkarnama

Satara NCP News : देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी जनतेने निवडणूक हाती घेतली होती. सत्ताधाऱ्यांविषयी प्रचंड नाराजीचे वातावरण असून महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल. केंद्रात इंडिया आघाडी सत्तेत येईल, असा ठाम विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी 4 जूनला होणाऱ्या लोकसभेच्या निकालावर भाष्य केले. सातारा लोकसभेबाबत बोलताना ते म्हणाले, येथील निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराबाबत प्रचंड नाराजी होती. त्याचा परिणाम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पहायला मिळाला. लोकांची उमेदवाराबरोबरच भाजप BJP पक्षाविषयीही नाराजी होती.त्यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निश्चित होणार आहे.

राममंदीराचा करिष्मा फारसा पहायला मिळाला नाही. जनतेने स्वत:च्या हातात ही निवडणूक घेतली होती. त्यामुळे लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानानंतर भाजपच्या लक्षात आले की आपल्या हातून जागा जात आहेत. त्यामुळे त्यांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली, असा दावाही शिंदेंनी केला.

मराठा आणि मुस्लिम समाजात महायुतीविषयी राग असल्याने त्यांनी त्यांना मतदान केले नाही. सध्यातरी भाजपला केंद्रात आपले सरकार येईल, असे वाटत नाही, असा ठाम विश्वास शशिकांत शिंदेंनी व्यक्त करताना महाविकास आघाडी महाराष्ट्रात मोठे यश मिळवेल, असे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shashikant Shinde
Sandipan Bhumre On Lok Sabha Result : पहिला नंबर माझाच; खैरे-इम्तियाज यांच्यात दुसऱ्या नंबरसाठी स्पर्धा, भुमरेंचा दावा

साताऱ्याच्या निकालाकडे लक्ष

भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे या हायव्होल्टेज लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 2019 मध्ये उदयनराजेंचा पराभव झाल होता.त्यामुळे त्या पराभवाचा वचपा यंदा ते काढणार की शशिकांत शिंदे इतिहास घडवणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com