शिर्डीची विमानसेवा झाली सुरू

दीड वर्षापासुन कोरोनामुळे ( Corona ) बंद असलेले काकडी ( Kakadi ) (ता. कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळ ( Shirdi Airport ) आजपासून ( रविवार ) पासुन सुरू झाले.
Shirdi Airport
Shirdi AirportArun Gawhane
Published on
Updated on

अरूण गव्हाणे

पोहेगाव ( अहमदनगर ) : दीड वर्षापासुन कोरोनामुळे बंद असलेले काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळ आजपासून ( रविवार ) पासुन सुरू झाले. त्यामुळे आता साई भक्तांना शिर्डीत येण्यासाठी विमानाची सेवा उपलब्ध झाली आहे. एप्रिल 2020 मध्ये कोरोनामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून हे विमानतळ बंद होते. Shirdi airline started

साई मंदिरही बंद असल्याने साईभक्त शिर्डीकडे येत नव्हते. आता मंदिरेही खुले होणार असल्याने विमान सेवा सुरु होणे गरजेचे होते. त्यादृष्टीने विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाची विमाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात काही दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक घेऊन हे विमानतळ सुरू करण्याचे आदेश दिले होते.

Shirdi Airport
चिपी विमानतळ उद्घाटनावर बहिष्कार;पाहा व्हिडिओ

सुरुवातीला दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणची विमानसेवा स्पाईसजेट व इंडीगो एअरलाईन सुरु करणार आहे. यातील आज एकच विमान आले. हे विमान आज चेन्नई वरून 172 प्रवासी घेऊन आले. तेच विमान 38 प्रवासी घेऊन गेले. हे विमान स्पाईसजेट कंपनीचे होते. या पुढे प्रवाशांच्या उपलब्धते नुसार विमानांच्या फेऱ्या वाढणार आहेत.

दृष्यमानतेमुळे मागे अनेक वेळी विमान उड्डाणे रद्द होती. अठरा महिन्यानंतर विमानसेवा सुरु होत असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच काकडीतील वाहनधारकांनाही रोजगार सुरु होईल. लवकरात लवकर पुर्वी सुरु असलेली सर्व 28 विमानसेवा या विमानतळावरुन सुरु व्हावी, अशी साईभक्तांची अपेक्षा आहे. काकडी येथील ग्रामस्थ व टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विमान प्रवाशांचे शाल देऊन व पेढा भरवून स्वागत केले. या अभिनव स्वागतामुळे साई भक्त प्रवासी भारवून गेले.

Shirdi Airport
मोठी बातमी : काबूल विमानतळ स्फोटानं हादरलं, आत्मघातकी हल्ला झाल्याची शक्यता

या आहेत अडचणी

विमानतळ बंद असल्याच्या काळात या ठिकाणी नाईट लॅंडीगची कामे झाली. त्यात काही अडचणी आहेत. कार्गो सेवा सुरु करण्याच्या हालचालीही येथुन सुरु आहेत. मध्यंतरी त्यासाठी अनेक बैठका पार पडल्या. कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या. देशात विमानतळ सुरु झाल्यानंतर सुरुवातीपासुन सर्वाधिक पसंती मिळालेले हे विमानतळ आहे. या ठिकाणी अजुन अत्याधुनिक सुविधा वाढविणे आवश्यक आहे. येथे दृष्यमानतेची अनेक वेळी अडचण निर्माण होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com