मटका किंग खूनप्रकरण; भाजपच्या माथाडी नेत्याला अटक

पुणे Pune येथे संशयितास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मोक्यातील (MOCCA) फरारी आरोपी व पाच साथीदारांनी आर्थिक देवाण घेवाणीवरून गोळी मारून खून केल्याचे निष्पन्न झाले.
shirwal Murder Issue
shirwal Murder Issuepune reporter
Published on
Updated on

पुणे : शिरवळ येथे महामार्गालगत असणाऱ्या फुलमळा या ठिकाणी लेक पॅलेस अपार्टमेंट येथे संजय सुभाष पाटोळे (वय ३१, रा. बिबवेवाडी, पुणे) यांची दोन दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या झाली होती. शिरवळ पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने याचा तपास १२ तासांच्या आत करून याप्रकरणी पुणे येथून तीन, तर फलटण येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. आज याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश भाजपा माथाडी नेता अमोल हुलावळे यांला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. मटका किंगचा हुलावळे आणि इतर सात जणांना शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे.

शिरवळमधील सहा मजली असलेल्या लेक पॅलेसच्या टेरेसवर एक युवक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या वेळी अज्ञाताने गोळी मारून खून केल्याचे दिसून आले. येथे गोळी झाडलेली एक पुंगळीही पोलिसांना सापडली. दरम्यान, संशयित व मृत पाटोळे यांनी जेवण करून फ्लॉटमध्ये पार्टीही केली होती. खून झाल्यानंतर येथे सापडलेल्या चित्रवस्तूच्या रूपाने मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात आली.

shirwal Murder Issue
Video : खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा कार्यक्रमात उडवली कॉलर...

दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य पाहता वरिष्ठांच्या सूचनेनुसार, एलसीबीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, शिरवळचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, उपनिरीक्षक गणेश वाघ व सतीश आंदेलवार यांच्या अधिपत्याखाली तपास पथके रवाना करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे येथे संशयितास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मोक्यातील फरारी आरोपी व पाच साथीदारांनी आर्थिक देवाणघेवाणीवरून मृत व्यक्तीला गोळी मारून खून केल्याचे निष्पन्न झाले.

shirwal Murder Issue
महाविकास आघाडी सरकारने वैधानिक महामंडळ, मराठवाडा वाॅटरग्रीडचा खून केला..

यानंतर पुणे येथून तीन व फलटणवरून दोन असे पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मटकाकिंग संशयित तरबेज सुतारसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये तरबेज महंमद सुतार (वय ३१, रा. ओमसाई अपार्टमेंट वरखडेनगर कात्रज पुणे, विकी राजेंद्र जाधव (रा. वानवडी, केदारीनगर, पुणे), शंकर अश्रुबा पारवे उर्फ तात्या पारवे (रा. अंबामाता मंदिर सुखसाखरनगर बिबेवाडी, पुणे), नितीश संषीत पतंगे (रा. अप्पर कोंडवा रोड साईनगर बिबेवाडी, पुणे), राकेश सुरेश गायकवाड (रा. आनंदनगर मार्केटयार्ड, पुणे), किरण बबनराव साळुंखे (रा. आंबेगाव, पठार पुणे) अशी संशयितांची नावे आहेत.

shirwal Murder Issue
दोन्ही राजे आमचेच...सातारा पालिकेचा निर्णय फडणवीस घेतील...

त्यांच्याकडे सहा ते सात मोबाईल फोन, बॅटरी व रोख रक्कम आढळून आली होती. दरम्यान, सायंकाळी उशिरा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

shirwal Murder Issue
Video:भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे, रामराजे निंबाळकरांची माहिती

दरम्यान, आज याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश भाजपचा माथाडी नेता अमोल हुलावळे यांला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. हुलावळे हा गोल्ड मॅन म्हणून प्रसिंध्द असून अवैध व्यावसायाच्या आर्थिक वादातूनहा प्रकार झाल्यामुळे मटका किंग हुलावळे आणि इतर सात जणांना शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com