Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त सातारामधील शिवतीर्थावर होणार हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Satara : शंभर फुटी ध्वजाचे अनावरणही केले जाणार; महाआरती सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त सज्ज
Satara  Shivtirtha
Satara ShivtirthaSarkarnama
Published on
Updated on

Satara Shivtirtha News : शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारामधील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

यंदा खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने शाही शिवजयंती सोहळ्याची तयारी केली आहे. पोवई नाक्यावर सोमवारी सकाळी साडेसात वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून, शंभर फुटी ध्वजाचे अनावरण नक्षत्र संस्थेच्या अध्यक्षा दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे

छत्रपती शिवरायांची 394वी जयंती सातारा शहरांत विविध उपक्रमांनी साजरी होत आहे . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवज्योती सोमवारी सकाळपासून साताऱ्यात येणार असून त्यांचे स्वागत करण्यासाठी पोवई नाक्यावर स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा जिल्हा पोलिसांनी शिवपुतळ्यासह शहरात विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवतीर्थावर शंभर फुटी ध्वजाचे अनावरण सोमवारी सकाळी नक्षत्र समूहाच्या अध्यक्षा दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satara  Shivtirtha
Shivsena Mahaadhiveshan : जिथून डरकाळी निघायची, तिथून शिव्याशाप येतात..! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बरसले...

या निमित्ताने सकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक आणि त्यानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा विकास आघाडीचे सर्व सदस्य तसेच उदयनराजे भोसले मित्र समूहाचे सर्व पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जलाभिषेकासाठी सातारा जिल्ह्यातील पाच नद्यांचे पाणी आणण्यात येणार आहे. शिवतीर्थाचे सुशोभीकरणाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात असून आठ कोटींचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. शिवतीर्थावरील शिवपुतळ्याचा परिसर भगव्या झेंड्यांनी सुशोभित करण्यात आला आहे. आकर्षण म्हणजे पोवई नाक्यावरील शिवपुतळ्याला हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार उदयनराजे भोसले मित्र समुहाच्यावतीने या सर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. शिवजयंती महोत्सवासाठी सातारा शहरांमध्ये ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर सुद्धा भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Satara  Shivtirtha
Dhangar Reservation News : 'आरक्षण देईल त्याच पक्षाला मतदान करा' ; अण्णासाहेब डांगेंचं धनगर समाजाला आवाहन!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com