टायगर अभी जिंदा है! शहाजी पाटील अजितदादांसह राऊतांवर तुटून पडले

बंडानंतर शहाजी पाटील मंगळवारी पहिल्यांदाच सांगोला मतदारसंघात आले.
MLA Shahaji Patil Latest News, Shiv Sena Latest News
MLA Shahaji Patil Latest News, Shiv Sena Latest NewsSarkarnama

सांगोला : 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल..' या डायलॉगमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांचं मंगळवारी मतदारसंघात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. खासदार संजय राऊतांसह (Sanjay Raut) पक्षातील अनेकांनी केलेले टीकेला पाटील यांनी यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'टायगर अभी जिंदा है, असं म्हणत त्यांनी टीकाकारांना इशारा दिला. त्यांनी अजित पवारांवरही (Ajit Pawar) टीकास्त्र सोडलं. (Shiv Sena MLA Shahaji Patil Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या 40 आमदारांमध्ये शहाजी पाटील यांचाही समावेश आहे. शिंदे सरकारने बहुमत चाचणी यशस्वीपणे पार केल्यानंतर पाटील यांचे मंगळवारी सांगोला मतदारसंघात आगमन झाले. हजारो कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढत सत्कार केला. त्यानंतर शहाजीबापूंनी आपल्या खास शैलीत नेत्यांचा समाचार घेतला.

MLA Shahaji Patil Latest News, Shiv Sena Latest News
शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीस रात्री हुडी घालून बाहेर पडायचे : अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

राऊतांवर टीका करताना पाटील म्हणाले, संजय राऊत हे शिवसेनेचे नारदमुनी आहेते. आम्हाला शिवसेना समजावण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. ठाकरे घराणे संपवायची सुपारीच त्यांनी घेतलीय. आमचं काय जळत होतं ते आम्हालाच माहीत होतं. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसेनेला लागलेली वाळवी आम्ही काढून टाकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बाहेर नेले नसून आम्हीच शिंदे साहेबांना बाहेर घेऊन गेलो होतो.

निधी देऊनही बारामतीचे कामच संपेना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, अजित पवार यांनी माझ्या झाडी, डोंगराचा उल्लेख केला याबद्दल धन्यवाद देतो. परंतु सांगोल्याला दिलेल्या निधीचा तुम्ही जाहीर उल्लेख करता तसाच अजितदादा तुम्ही तुमच्या मातेची शपथ घेऊन बारामतीला दिलेला निधीही जाहीर करा, असं आव्हान पाटील यांनी दिलं. आजपर्यंत एवढा निधी देऊनही बारामतीचे कामच संपेना. यावर आता पीएचडीच करावी लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री भेटतच नव्हते

आपल्या अडीच वर्षाचे आमदारकीच्या काळात फक्त दोनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याचे सांगत पाटील म्हणाले, ही भेटही इतर आमदारांसोबत झाली होती. त्यामुळे तालुक्यातील प्रश्नांची, समस्यांची स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाच करता येत नसल्याचा खंतही आमदार पाटील यांनी बोलून दाखवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com