कर्डिलेंनी केली अराजकीय शेतकऱ्याशी सोयरीक

भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांना चार मुली व एक मुलगा आहे. त्यांनी तीन मुली राजकीय कुटुंबात दिल्या. मात्र मुलाच्या लग्ना बाबत वेगळा विचार केला आहे.
अक्षय कर्डिले आणि प्रियंका कासार
अक्षय कर्डिले आणि प्रियंका कासारसरकारनामा
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणाचा नगर शहरात पहिला यशस्वी प्रयोग माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी यशस्वी करून दाखविला होता. त्यांनी त्यांच्या तीन मुली नगर शहर व तालुक्यातील राजकीय प्रतिष्ठीतांच्या घरात दिल्या. दोन जावयांना महापौर केले. तीनही मुलींना महापालिकेत नगरसेवक केले. मात्र मुलाच्या लग्नाच्या वेळी वेगळा विचार केला आहे. Shivaji Kardile's son will have an engagement with a farmer's daughter

बुऱ्हाणनगर या ऐतिहासिक गावातील दुग्ध व्यवसायिक असलेल्या शिवाजी कर्डिले यांचा जीवनाच्या यशाचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. सरपंच, आमदार, मंत्री अशी पदे भुषविलेल्या कर्डिलेंनी कधी सामान्य लोकांशी आपली नाळ तुटू दिली नाही. तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रमाले ते हजेरी लावतात. सामान्यांशी गप्पा मारतात. तोच सामान्यांशी जनसंपर्क शिवाजी कर्डिले यांचे चिरंजिव अक्षयही वाढवू लागले आहेत. मार्च 2022मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अक्षय कर्डिलेंनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

अक्षय कर्डिले आणि प्रियंका कासार
दुधवाला शिवा असा झाला सरपंच ! जुन्या आठवणीत रमले शिवाजी कर्डिले

शिवाजी कर्डिले यांनी सर्वात मोठी मुलगी कोतकरांच्या घरात, दुसरी जगतापांच्या तर तिसरी गाडेंच्या घरात दिली आहे. मोठी मुलगी सुवर्णा कोतकर या नगर महापालिकेत उपमहापौर राहिल्या आहेत. शीतल जगताप व ज्योती गाडे या विद्यमान नगरसेविका आहेत. जावई संग्राम जगताप आमदार आहेत. त्यांनी नगर महापालिकेत दोन वेळा महापौरपदही भूषविले आहे. जावई संदीप कोतकर हे माजी महापौर राहिले आहेत.

अक्षय कर्डिले आणि प्रियंका कासार
बहिणींची माया अन दाजींच्या शुभेच्छा ! अक्षय कर्डिले यांची राजकीय गाडी सुसाट

कर्डिले यांनी मुलींसाठी मोठी राजकीय कुटूंबे निवडली. मात्र मुलाच्या लग्नासाठी वेगळा विचार केला. राजकीय नसलेल्या प्रगतिशील शेतकरी कुटूंबातील मुलीला सून करून घेण्याचा निर्णय शिवाजी कर्डिलेंनी घेतला आहे. कापूरवाडी (ता. नगर ) येथील कर्डिले समर्थक असलेल्या राजेंद्र कासार यांची मुलगी प्रियंका व अक्षय कर्डिले यांचा साखरपुडा बुधवारी ( ता. 1 डिसेंबर ) सायंकाळी सहा वाजता नगर शहरातील सावेडी भागातील बंधन लॉन येथे होणार आहे. या साखरपुड्यासाठी जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com