‘दामाजी’च्या अध्यक्षपदी परिचारक समर्थक शिवानंद पाटील; कारखान्याची गाडी न वापरण्याचा निर्णय!

दामाजी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील, उपाध्यक्षपदी तानाजी खरात यांची निवड
Damaji Sugar Factory : Shivanand Patil -Tanaji Kharat
Damaji Sugar Factory : Shivanand Patil -Tanaji KharatSarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : ‘‘अडचणीतल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याची (Damaji Sugar Factory) जबाबदारी आम्ही आता स्वीकारली आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता संस्थेची गाडी वापरणार नसल्याचे सांगून १९७ कोटींचा कर्जाचा बोझा डोक्यावर असला तरी शेतकरीहितास पात्र राहील असाच कारभार करू,’’ अशी ग्वाही दामाजी कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली. (Shivanand Patil as President, Tanaji Kharat as Vice President of Damaji Sugar Factory)

मंगळवेढा (Mangalveda) तालुक्यातील दामाजी कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड आज (ता. २६ जुलै) कारखाना कार्यस्थळावर पार पडली. कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांचे कट्टर समर्थक शिवानंद पाटील यांच्याकडे सोपवली आहे. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) गटाचे समर्थक तानाजी खरात यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

नूतन अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की, आगामी काळात शेतकऱ्यांची अडवणूक केली जाणार नाही. कारखान्यातील कामकाज बघण्याचा अधिकार सर्वांना राहणार आहे. पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे नवीन सभासद सभासद खुले करणार आहे. संस्था अडचणीत असल्याने शेतकरी, कामगार, वाहन मालक या सर्वांना सोबत घेऊन काम करताना समविचारी गटाला विजयी करण्यासाठी झटलेल्या सर्व नेत्यांना आठ दिवसांतून एकदा निमंत्रित करून कारभाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बोलवणार आहे. तसेच, कारखाना चालवताना राजकीय विचार हे प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवून ही समविचारी आघाडी पाच वर्षांसाठी कशी बांधील राहील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मयत व थकबाकीदार सभासदांना भविष्यात मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाही.

अजित जगताप म्हणाले की, कारखाना निवडणुकीतील यशानंतर आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतदेखील समविचारी आघाडी कायम ठेवू, असा प्रस्ताव मांडला. ॲड नंदकुमार पवार म्हणाले की, कारखान्यावर आम्ही सांगितल्याप्रमाणे २०० कोटींचे कर्ज आहे, त्यामुळे हा कारखाना कसा चालवावा, हा मोठा प्रश्न विद्यमान संचालक मंडळासमोर आहे. शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, कारखान्याचा अध्यक्ष म्हणून काम करताना मी कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न केले. सध्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नाही, त्यामुळे कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू. संचालक पी. बी. पाटील म्हणाले की, सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून काम करू व कारखान्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करूयात.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, जिजामाता परिवाराचे रामकृष्ण नागणे, ॲड नंदकुमार पवार, प्रकाश गायकवाड, रामचंद्र वाकडे, युन्नुस शेख, दत्तात्रेय खडतरे, शशिकांत बुगडे, यादाप्पा माळी, चंद्रशेखर कौंडुभैरी, अरूण किल्लेदार, भारत पाटील सर्व संचालक व तसेच कामगार, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com