सातारा : साताऱ्यात पुन्हा एकदा दोन राजेंमधील (Udayan Raje vs Shivendra Raje) संघर्ष उफाळून आला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक निवडणूकीनंतर आता साताऱ्यात नगरपालिका निवडणूकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही राजे आमने-सामने आले आहेत. नारळफोड्या आणि घरफोड्या या टीकांनंतर आमदार शिवेंद्रराजेंनी (Shivendra Raje) आता खासदार छत्रपती उदयनराजेंची (Udayan Raje) थेट बुद्धीमत्ता काढली आहे.
साताऱ्यात सध्या नगरपालिकेच्या निवडणूकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे दोन्ही राजे टीकेची एक ही संधी सोडताना दिसत नाहीत. कालच खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंवर त्यांची बुद्धी लहान असल्याची टीका केली होती. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी आमची बुद्धी लहान असेल पण, खासदार साहेबांची बुद्धी अफाट आणि अचाट आहे, असे आमचे मत आहे, अशी टीका केली.
शिवेंद्रराजे म्हणाले, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. उदयनराजेंच्या बुद्धीचे अविष्कार आणि पराक्रम बघितले तर लोकांमधून निवडून येत आलेली लोकसभा घालवून राज्यसभेत मागच्या दाराने गेले. हे स्वतःच्या बुद्धीने जाऊन बसलेत, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांच्यावर केली आहे.
घरफोड्या विरुद्ध नारळफोड्या :
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मध्यंतरी साताऱ्यात नारळ फोडयांची गँग आली असल्याची टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर केली होती. त्याला काल उदयनराजे भोसले यांनी प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले होते, काम केली म्हणून आम्ही नारळ फोडतो. पण दिशाहीन झालेले अत्यंत संकुचित वृत्तीची काही लोक असतात, त्यांच्याकडून अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होते. आम्ही कामाचे नारळ फोडतो, केवळ त्यांच्या घराण्याकडे पाहून लोकांनी पैसे गुंतवले होते. आम्ही कोणाची घरे फोडली नाहीत, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नामोल्लेख टाळून केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.