रामजन्मोत्सवापूर्वीच श्रीरामपूर तालुका हादरला : माथेफिरू पतीने कुटुंब संपविले

एका माथेफिरू पतीने स्वतःची पत्नी व चार वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे.
Crime news
Crime newsSarkarnama
Published on
Updated on

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - श्रीरामपूर येथे रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र यंदाच्या रामजन्मोत्सवापूर्वीच श्रीरामपूर तालुका हादरला आहे. एका माथेफिरू पतीने स्वतःची पत्नी व चार वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. या संदर्भात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ( Shrirampur taluka was shaken before Ramjanmotsava: Mathefiru's husband ended the family )

श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे चितळी रस्त्यावर कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व मुलाचा खून केल्याची दुर्दैवी घटना सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली. रामनवमीच्या दिवशी रामजन्मोत्सवापूर्वी घडलेल्या या घटनेने तालुका हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Crime news
अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्यास फाशीची शिक्षा

अक्षदा बलराज कुदळे ( वय 28 ) व शिवतेज बलराज कुदळे ( वय साडेचार वर्षे) अशी खून झालेल्या मायलेकांची नावे आहेत. बलराज दत्तात्रय कुदळे (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास बलराज याने प्रथम पत्नीच्या डोक्यात कुदळीने घाव घातला व नंतर मुलाला आंब्याच्या झाडाला गळफास दिला.

Crime news
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

घटनेनंतर बलराजने आपल्या चाकण येथील मेव्हण्याला व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती व मृत्यूमुखी पडलेल्या पत्नी व मुलाला दाखविले. त्यांचे फोटो काढून नातेवाईकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही टाकले. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस ठाण्यात अक्षदाच्या माहेरकडील मंडळी मोठ्या प्रमाणात जमली होती. या घटनेने संतापाबरोबरच हळहळ व्यक्त केली जात होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com