Political Breaking News: देशातील लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपाची आता उलटी गणती सुरू झालेली आहे. भाजपचा नायनाट करण्यासाठी विरोधी पक्षांची महत्त्वाच्या तीन मुद्द्यांवर एकजूट घडत आहे. याचा प्रत्यय पुढील काहीच दिवसात दिसून येईल, असा ठाम विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) सर सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केला आहे. ते आज सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते.
"देशातील पदक मिळवलेले कुस्तीपटू न्यायाची याचना करत रस्त्यावर उतरत आहेत, पण सरकार ठप्प आहे. पूर्वी हेच पंतप्रधान त्यांचे कौतुक करत होते, मात्र ते आज काही यावर काही बोलत नाहीत. सर्वेोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही काही होत नाही. एकीकडे खेळाडू आंदोलन करत होते आणि दुसरीकडे पंतप्रधान राज्याभिषेक प्रमाणे सेंगोल घेऊन संसदेत वावरत होते. वास्तविक पाहता राजे लोकांचा राज्याभिषेक होताना सेंगोल बसवला जातो, असे ही येचुरी म्हणाले.
2022 मध्ये 56 दिवस संसद भरली. पूर्वी 212 दिवस पार्लमेंट भरत होती. कायदे बनविण्यासाठी एक कमिटी असायची पण आता सगळे बदलले आहे. कोणत्याही कायद्यावर चर्चा न होता विधेयकं पास होतात. नवीन इमारत बनवून उपयोग नाही तर संसदेचे कार्य मजबूत व्हायला हवे, असे ही येचुरी म्हणाले.
अदाणीप्रकरणी सरकार गप्प आहे. संसदेत जे प्रश्न विचारले ते रेकॉर्डवरून काढून टाकलेसरकार आणि राजतंत्र पासून त्याला बाजूला ठेवले पाहिजे. विरोधी पक्षाला देशाला सुधारण्याऐवजी वाचावावे लागतेय. भाजपला बाजूला ठेवण्यासाठी विरोधकांना एकत्र व्हावे लागेल.त्यासाठी आपसातील काही गोष्टी बाजूला ठेवावे लागतील सामूहिक पणे अजेंडा ठरवला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला पाहिजे. अँटी बीजेपी मत मिळवण्यासाठी काम केले पाहिजे, असे येचुरी म्हणाले.
नितीशकुमार यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेस येणार नाही असे कोणी सांगितले? आम्ही 12 तारखेला पाटण्याला जाणार आहोत. आम्ही वाजपेयी यांना देखील चांगली टक्कर दिली होती. त्यांच्या शायनींग इंडिया, फील गुड फॅक्टरला आम्ही घालवले. त्याकाळी वाजपेयी शिवाय कोणी नव्हते. पण तेव्हा ईडी, सीबीआयचा दुरुपयोग पूर्वी होत नव्हता. आता नवा पायंडा पडला जातोय देशात कुठेही निवडणूक झाली तरी सरकार भाजपच बनवत आहे. भाजपला कुणी हरवत नाही, ही अफ़वा पसरवली जात आहे अनेक राज्यात भाजपाला हरवले आहे, असे
तपास यंत्रणांनी 5700 केस दाखल केल्या आहेत, त्यापैकी 23 लोकांना शिक्षा झालीय. लोकांवर कारवाई करून त्यांना अडकवले जाते हे योग्य आहे का? नाव बदलल्याने इतिहास कसा बदलणार? हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ वाढवण्यासाठी नाव बदलले जाते. ध्रुवीकरणाच्या माध्यमातून भाजप आपला फायदा करून घेतोय, असा आरोपही सीताराम येचुरी यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.