Madha Lok Sabha News : सांगोल्यातील राड्यानंतर शेकापचे कार्यकर्ते आक्रमक; गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन करणार

Political News : शेतकरी कामगार पक्षातील देशमुख गटाचे कार्यकर्ते व शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यात वाद झाला. त्यानंतर झालेल्या हाणामारीत कार्यकर्ते जखमी झाले.
babasaheb desmukh
babasaheb desmukh Sarkarnama
Published on
Updated on

Sangola News : सांगोला तालुक्यातील महूद येथे मंगळवारी मतदान होत असताना शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाचे पाच ते सहा जण गंभीर जखमी झाली आहेत. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सोडण्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षातील देशमुख गटाचे कार्यकर्ते व शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यात वाद झाला. त्यानंतर झालेल्या हाणामारीत कार्यकर्ते जखमी झाले.

माढा मतदारसंघातून महायुतीकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Nimbalakar) हे निवडणूक लढवत असून त्यांची निवडणूक महाविकास आघाडीचे (MVA) धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairysheel Mohite Patil) यांच्या सोबत होत आहे. या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी मतदानावेळी सांगोला तालुक्यात कार्यकर्त्यांत राडा झाला. त्या हाणामारीत पाच ते सहा जण कार्यकर्ते जखमी झाले. ( Madha Lok Sabha News )

babasaheb desmukh
Supriya Sule News : सुप्रिया सुळेंनी मतदानानंतर थेट अजितदादांचं घर गाठलं; काय आहे कारण?

बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला रोखल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. ही मारहाण करूनही पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास बुधवारी सांगोला बंद करू, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला आहे.

सांगोला तालुक्यातील महूद येथे मंगळवारी दुपारी बोगस मतदान करण्याच्या कारणावरून शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये दोन्ही गटाचे पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या शंकर पाटील कार्यकर्ते व एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्ताधारी आमदारांकडून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न

याशिवाय मंगळवारी सकाळी भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप करत असताना भरारी पथकाने त्याचे इन कॅमेरा शूटिंग करून ही संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जात नाही. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा उद्या सांगोला बंद करण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

babasaheb desmukh
Madha Lok Sabha Election : सांगोल्यात देशमुख, पाटलांचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांना केले रक्तबंबाळ

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com