महेश कोठे राष्ट्रवादीत कधी येणार? : सोलापुरातील नेत्यांचा प्रश्न; जयंत पाटील म्हणाले, ‘ते आपलेच’!

अजितदादांचा महिन्याला; तर भरणेमामांचा पंधरा दिवसाला होणार सोलापूरचा दौरा
Solapur NCP Meeting
Solapur NCP MeetingSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार पायउतार झाल्यानंतर सोलापूर (Solapur) शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांची पहिलीच बैठक आज (ता. २९ सप्टेंबर) मुंबईतील राष्ट्रवादी भवनात झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे , सोलापूरचे निरीक्षक शेखर माने यांच्यासोबत झालेल्या बैठकीला सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kote) उपस्थित होते. (Solapur NCP meeting became famous after the entry of Mahesh Kote)

महेश कोठे राष्ट्रवादीत कधी प्रवेश करणार? हा प्रश्‍न सोलापुरातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी उपस्थित केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; परंतु बैठक संपल्यानंतरही तोच प्रश्‍न कायम होता, कोठे राष्ट्रवादीत प्रवेश कधी करणार?, माजी पालकमंत्री तथा सोलापूर राष्ट्रवादीचे नूतन प्रभारी भरणे हे ७ ऑक्टोबरला सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत, तर अजित पवार हे १५ ऑक्टोबरनंतर दिवाळीपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात सोलापूर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघाचे तीन स्वतंत्र मेळावे, अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती-जमाती सेलचे मेळावे घेण्यात येणार आहेत.

Solapur NCP Meeting
...त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची समजूत काढली होती : चव्हाणांनंतर राऊतांचा गौप्यस्फोट

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना माजी महापौर महेश कोठे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आले होते. सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर गेली. मुख्यमंत्रीपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर कोठे व त्यांचे समर्थक मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात असल्याने कोठे नक्की कोणत्या पक्षात आहेत, या बद्दल संभ्रम असल्याचे आजच्या बैठकीत दिसून आले.

Solapur NCP Meeting
अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर अडचण होईल : शेलारांचा गंभीर इशारा!

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोठे यांची बाजू भक्कमपणे लावून धरली. तत्कालिन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यामुळे त्यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरमधील प्रवेशाच्या कार्यक्रमात कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मर्यादा आल्या होत्या. तांत्रिकदृष्ट्या कोठे यांचा प्रवेश झाला नसला तरीही ते राष्ट्रवादीसोबतच आहेत. आपल्या बैठकांना हजर राहतात, पक्षवाढीसाठी काम करतात, असा मुद्दा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या बैठकीत मांडल्याचे समजते.

Solapur NCP Meeting
Khaire : शिंदे यांनी यापुर्वीच गद्दारीचा प्रयत्न केला होता, तेच काॅंग्रेससोबत जाण्यास आतूर होते..

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीला माजी महापौर कोठे, शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, माजी नरगसेवक तौफिक शेख, दिलीप कोल्हे, प्रमोद गायकवाड, महेश गादेकर, शंकर पाटील, प्रशांत बाबर, सुहास कदम, विद्या लोलगे आदी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची रणनीती कशी असावी, याची चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली. बैठकीत गादेकर व बागवान यांनी कोठे यांच्या प्रवेशाचा मुद्दा उपस्थित केल्याचे समजते. शहराध्यक्ष बदलाबाबत फारशी चर्चा आजच्या बैठकीत झाली नसल्याचे समजते.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महिन्यातून एकदा सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेले इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्याकडे सोलापूर राष्ट्रवादीच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रभारी भरणे हे पंधरा दिवसांमधून एकदा सोलापू्रचा दौरा करणार आहेत. सोलापुरातील ३८ प्रभागांमध्ये भरणे यांच्या उपस्थितीत बैठका होणार आहेत. कोठे सध्या कुठे आहेत, याचे उत्तर या बैठकांमधून देण्याचे आजच्या बैठकीत ठरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com