Solapur Vidhan Sabha Election : लोकसभेतील यशानंतर सोलापुरात काँग्रेसनं विधानसभेसाठी कसली कंबर

Congress ready for the Vidhan Sabha Election Solapur : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये होणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघामध्ये विविध पक्षांकडून उमेदवारासाठी चाचपणी सुरु आहे.
Nana Patole Praniti Shinde Congress Vidhan Sabha Election
Nana Patole Praniti Shinde Congress Vidhan Sabha ElectionSarkarnama

Solapur News : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघामध्ये विविध पक्षांकडून उमेदवारासाठी चाचपणी सुरु आहे.

सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शहरातील आणि जिल्हातील 11 मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे उमेदवारी अर्ज द्यावेत, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष ॲड, नंदकुमार पवार आणि शहराध्यक्ष चेतन नरोटो यांनी केले आहे.

महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार की आघाडीतच निवडणुकीच्या मैदानात उतरणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) रणनिती आखण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Nana Patole Praniti Shinde Congress Vidhan Sabha Election
Video Assembly Session : वडेट्टीवार, जाधव, पटोले सरकारवर तुटून पडले, महाजनांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं अन्...; नेमकं काय घडलं?

सध्या काँग्रेसकडे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, शहर मध्य, अक्कलकोट हे तीन मतदानसंघ आहेत. पण, काँग्रेसने (Congress) येत्या विधानसभा निवडणुकीत ११ मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे. जर ही विधानसभा निवडणूक स्वबळावर न लढता युती करत लढवण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीच्या जागावाटपात आता काँग्रेसला जिल्ह्यातील किती जागा मिळणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Nana Patole Praniti Shinde Congress Vidhan Sabha Election
Nana Patole : 'जीव घ्या आणि आरामात फाईव्ह स्टार व्यवस्थेत राहा'; नाना पटोले संतापले

त्यानुसार, सोलापूर शहर- जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी 5 ऑगस्टपर्यंत सोलापुरातील काँग्रेस भवनात अर्ज जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com