Nana Patole : 'जीव घ्या आणि आरामात फाईव्ह स्टार व्यवस्थेत राहा'; नाना पटोले संतापले

Nana Patole Comment on Mumbai Hit and Run Case : मुंबईच्या वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरणातील मुख्य आरोपी तीन दिवसापासून पसार आहे. यावर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सरकारला खोचक शब्दात सुनावले आहे. 'जीव घ्या आणि फाईव्ह स्टार व्यवस्थेत राहा', अशी या सरकारची भूमिका असल्याचा टोला त्यांनी लगावला.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Congress state president Nana Patole : मुंबईतील वरळीमधील 'हिट अँड रन' प्रकरणातील मुख्य आरोपी अजून पसार आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर सरकारला जोरदार सुनावले आहे. "जीव घ्या आणि आरामात फाईव्ह स्टार व्यवस्थेत राहा", असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

तीन दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी भागात मध्यरात्री शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याच्या कारने दांपत्याला उडवले होते. यात महिलेचा मृत्यू झाला. महिलेला कारने सुमारे दीड किलोमीटर पर्यंत फरपटत नेले. यावरून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील मुख्य आरोपी अजून पसार आहे. तो सापडलेला नाही. यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. सुरुवातीला या घटनेत आरोपीकडून पुरावे अदृश्य करण्याचा प्रयत्न झाला. कारवरील पक्षाचे चिन्ह खोडण्यात आले. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत.

Nana Patole
Nitesh Rane : 'राहुल गांधी यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या'; नितेश राणे म्हणाले त्यांनी वारीत सहभागी होऊ नये

नाना पटोले यांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पसार असल्याच्या मुद्द्यावर खोसक प्रतिक्रिया दिली. या सरकारचा कारभार म्हणजे, 'जीव घ्या आणि आरामात फाईव्ह स्टार व्यवस्थेत राहा. सरकार मुख्य आरोपीला पाठीशी घालत आहे. त्याचाच भाग म्हणून की काय तो सापडत नाही, असेही नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

Nana Patole
Video Bacchu Kadu Politics : ...तर आम्ही स्वतंत्र; आमदार बच्चू कडू यांनी महायुतीची धाकधूक वाढवली!

दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदे Eknath Shinde गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली. हा अपघात आहे. तो पक्षाशी निगडित नाही. तो व्यक्तीने केलेला अपघात आहे. यातील आरोपीची कोणत्याही प्रकाराची गाय केली जाणार नाही. आरोपींचा शोध सुरू असून पोलिस त्यांचे काम करत आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रोसिजर असते. त्यानुसार पोलिस प्रशासन कारवाई करत आहे. पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com