पंकजा मुंडेंना दूर सारत भाजपने राम शिंदेंना पुढे नेले : भाजप कार्यकर्त्यांत कही खुशी कही गम

अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) व प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांचे मोठ्या संख्येत कार्यकर्ते आहेत.
Pankaja Munde & Ram Shinde
Pankaja Munde & Ram ShindeSarkarnama

जामखेड ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) व प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांचे मोठ्या संख्येत कार्यकर्ते आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आज उमेदवारी जाहीर केली यात राम शिंदे यांचे नाव होते तर पंकजा मुंडे यांचे नाव डावलण्यात आले. त्यामुळे भाजपमधील शिंदे समर्थकांत आनंद तर मुंडे समर्थकांत चिंतेचा वातावरण दिसून आले. ( Some happiness and some sorrow among BJP workers in Nagar district )

माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर होताच कर्जत व जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. कार्यकर्त्यांनी केला 'जल्लोष' अन् शिंदेंवर केला शुभेच्छांचा वर्षाव...! मात्र दुसरीकडे तालुक्यातील मुंडे समर्थकांनी माजी मंत्री पंकजा मुंडेंना डावल्याने नाराजी व्यक्त केली.

Pankaja Munde & Ram Shinde
अखेर पंकजा मुंडे, राम शिंदेंना संधी, दरेकर, लाड अ्न भारतीय रिंगणात?

कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघातून अडीच वर्षांपूर्वी माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले. शिंदेसह समर्थकांना हा पराभव प्रचंड जिव्हारी लागला होता. पंकजा मुंडे यांनाही परळीमधून मंत्री धनंजय मुंडे यांनी पराभूत केले. तेव्हापासून माजी मंत्री शिंदे व पंकजा मुंडेसह समर्थकांमध्ये अस्वस्थ होती. तर आमदार रोहित पवारांनी विविध संस्थांवर एकहाती सत्ता मिळवित स्वतःला राज्याच्या राजकारणात झोकून दिले. तर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन धनंजय मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. त्यांची वाढती लोकप्रियता आणि आगामी विधानसभा निवडणुकीत निर्माण होणाऱ्या डोकेदुखीला अडथळा निर्माण व्हावा याकरिता माजी मंत्री पंकजा मुंडे व राम शिंदेंचे राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरत होती.

भाजपने काल ( मंगळवारी ) रात्री जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत राम शिंदे यांचे नाव होते. मात्र पंकजा मुंडे यांचे नाव नव्हते. त्यामुळे कर्जत-जामखेड तालुक्यातील शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच शिंदे यांची वर्णी लागण्याची खात्री पटताच निवडक कर्यकर्त्यांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली. शिंदेंनी विधान परिषदेचा अर्ज दाखल करताच त्यांचे स्वागत केले.

Pankaja Munde & Ram Shinde
कर्डिलेंचा तो ठराव आला राम शिंदेंच्या कामी : भाजप कार्यकर्त्यांत जल्लोष

जामखेडला मिळाली दुसऱ्यांदा विधानपरिषदेची संधी

जामखेड येथील रहिवासी प्रसिद्ध कवी वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांना विधान परिषदेच्या सदस्य पदाची काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाली होती. त्यावेळी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार होते. त्याकाळात तात्कालीन आमदार फुटाणे यांच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांना आधार आणि उभारी देण्याचे काम झाले. त्यावेळी राज्यात सरकार असल्याने फुटाणेंची चांगली चलती होती.

कर्जत- जामखेड विधानसभा मतदार संघातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार हे आमदार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पवारांचा मंत्रिमंडळातही चांगला दबदबा आहे. त्यामुळे मतदारसंघांमध्ये ते ठरवतील त्या योजना मिळविण्यात आमदार रोहित पवार यशस्वी होत आहेत. त्यामुळे त्यांचा राज्यात बोलबाला आहे. कर्जत जामखेड मध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा झपाट्यामुळे राज्यातील विविध भागांत आमदार रोहित पवारांची लोकप्रियता वाढली असून तरुणांसाठी 'आकर्षण' ठरताहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पवारांना मतदारसंघात जखडून ठेवण्यासाठी भाजपने माजी मंत्री राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिल्याची चर्चा आहे.

Pankaja Munde & Ram Shinde
थोरात-विखे गटात झाली चुरशीची फाईट : अखेर चिठ्ठीने निकाल फिरविला

पंकजा मुंडेंना डावलल्याने मुंडे समर्थक नाराज

कर्जत- जामखेड व पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघांत स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना मानणारा मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे सलग पाच वेळा येथून 'भाजप' चे आमदार निवडून आलेले. मुंडेच्या राजकीय वाटचाली बाबतही येथील मतदार संवेदनशील ; त्यामुळे कालपासून माजी मंत्री राम शिंदे व माजी मंत्री पंकजा मुंडे या दोघांचीही विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याची चर्चा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष होता, ऐवढेच नाही तर सोशल मीडियावर अभिनंदनाचा पोस्टचा भडीमार सुरू होता. मात्र प्रत्यक्षात आज शिंदेंना उमेदवारी मिळाल्याने आनंद झाला असला तरी मुंडेंना डावलल्याने मात्र मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com