NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात

Maharashtra Politics: कोल्हापुरातून १९९९, २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर दिवंगत सदाशिवराव मंडलिक विजयी झाले. २००९ मध्ये मंडलिक हेच अपक्ष विजयी झाले, तर २०१४ मध्ये पुन्हा ‘घड्याळ’ चिन्हावर खासदार धनंजय महाडिक विजयी झाले.
NCP News
NCP NewsSarkarnama

निवास चौगुले

Kolhapur News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (Sharad Pawar)मिळालेले 'तुतारी' चिन्ह मतदारांपर्यंत पोहाेचविण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील (South Maharashtra) कोल्हापूरसह (Kolhapur) सांगली, सातारा जिल्ह्यांतून लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह ‘घड्याळ’ (Clock Symbol) गायब झाल्याचे चित्र आहे.

सध्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती अशा दोनच ठिकाणी ‘घड्याळ’ चिन्हासह राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर व हातकणंगले असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. कोल्हापुरातून १९९९, २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर दिवंगत सदाशिवराव मंडलिक विजयी झाले. २००९ मध्ये मंडलिक हेच अपक्ष विजयी झाले, तर २०१४ मध्ये पुन्हा ‘घड्याळ’ चिन्हावर खासदार धनंजय महाडिक विजयी झाले.

कोल्हापूरसह (Kolhapur) सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतून पक्षाचे ‘घड्याळ’ गायब झाले आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांनी महाडिक यांचा पराभव केला. हातकणंगलेतून १९९९ व २००४ ला निवेदिता माने राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर विजयी झाल्या. २००९ मध्ये त्यांचा पराभव झाला. आता या दोन्ही जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाला गेल्याने या मतदारसंघातही ‘घड्याळ’ दिसणार नाही.

शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. नव्या पक्षाची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली गेली आणि त्यावर सातारा जिल्ह्यात कळस चढवण्यात आला. कोल्हापूर (Kolhapur) व सातारा या दोन्ही जिल्ह्यांनी सातत्याने पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ दिली. सातारा जिल्ह्यात तर लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या दहा अशा बारापैकी ११ जागांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते.

NCP News
Chetan Narke News: छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी...सुरेश भटांची कविता म्हणत कोल्हापूरच्या आखाड्यातून घेतली माघार

कोल्हापुरात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या १२ पैकी लोकसभेच्या दोन्ही, तर विधानसभेच्या चार जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला होता. गेल्या वर्षी जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन खासदार आणि ४० आमदारांसह पक्षातून बाहेर पडले. या जोरावर त्यांना पक्षाचे अधिकृत ‘घड्याळ’ चिन्हही मिळाले. अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभाग मिळवला; पण लोकसभेच्या निवडणुकीत पुणे वगळता सातारा, कोल्हापूर व सांगली या एकेकाळी राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असलेल्या जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com