Satara News : शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; विकासकामांना १२ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर

Shivendra Raje Bhosale : आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहरातील विविधप्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधी मागणीचे पात्र जिल्हाधिकारी यांना दिले होते.
Shivendra Raje Bhosale
Shivendra Raje Bhosale Sarkarnama

Satara News: सातारा शहरातील विविध विकासकामांसाठी १२ कोटी ६४ लाख ५२ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीच्य २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता महाराष्ट्र नगरोत्थान महा अभियान अनुदान योजनेतून या निधीला मंजुरी दिली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje bhosale) यांनी सातारा शहरातील विविधप्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधी मागणीचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले होते. या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या नगरोत्थान महाअभियान अनुदान योजनेतून निधी मंजूर करण्यात आला आहे.

Shivendra Raje Bhosale
Haji Arafat Shaikh : भाजप नेते हाजी अराफत शेख यांना पुन्हा धमकी,गुन्हा दाखल

सातारा शहरातील अजंठा चौक येथील उड्डाण पुलाच्या खालील जागा विकसित करणे यासाठी १ कोटी ८७ लाख २४ हजार रुपये, अजिंक्यतारा किल्ला रस्ता विकसित करण्यासाठी (भाग १) १ कोटी ७१ लाख ९० हजार आणि किल्ल्याच्या दुसऱ्या भागातील रस्ता विकसित करण्यासाठी १ कोटी ७१ लाख ९० हजाररुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

Shivendra Raje Bhosale
Shiv Sena News : काम शिवसेनेचे, मेहनत महापालिकेची अन् प्रचाराच्या चिपळ्या भाजपच्या !

शहरातील बॉम्बे रेस्टोरंट चौक ते मंगलमूर्ती रेसिडेन्सी अपार्टमेंट अखेर गटर करणे यासाठी १ कोटी ५९ लाख ८१ हजार, प्रभाग क्र. १४, केसरकर पेठ सि.स.नं. ४६ अ नाला जवळ रिटेनिंग वॉल बांधणे १७ लाख १६ हजार, बगाडे हॉस्पिटल, कुंभारवाडा, शाहू उद्यान अखेर व गुरुवार पेठ कूपर कारखाना ते टोपे मामा दत्त मंदिर अखेर रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी ९९ लाख ५६ हजार अशी विविध रस्त्यांची मार्गी लावली जाणार आहे.

तसेच सातारा शहरातील भुयारी गटर योजनेमुळे खराब झालेले पश्चिम भागातील रस्ते दुरुस्त करणे यासाठी ७६ लाख ४० हजार आणि सातारा शहरातील मुख्य रस्त्यांना थर्मोप्लास्ट पेंट मारणे व रहदारीच्या विविध उपाययोजना करणे यासाठी ५१ लाख ९८ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com