अशी होती काळे-कोल्हेंची मैत्री

शंकरराव काळे व शंकरराव कोल्हे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात आयुष्यभर राजकीय संघर्ष केला.
Shankarrao Kale &Shankarrao Kolhe
Shankarrao Kale &Shankarrao KolheSarkarnama
Published on
Updated on

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - राजकारणात किती भांडावे आणि कुठे थांबावे, हे अवघ्या महाराष्ट्रात नगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार शंकरराव काळे या दोघा दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना फार चांगले कळते, अशा नेमक्या शब्दांत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या भांडणांचे आणि मैत्रीचे वर्णन करीत. ( Such was the friendship of Kale and Kolhe )

या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात आयुष्यभर राजकीय संघर्ष केला. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. एकमेकांच्या विरोधात आंदोलने केली. अटीतटीच्या विधानसभा निवडणुका लढविल्या. एकमेकांच्या प्रतिस्पर्ध्यांना मदतीचा हात दिला. अनेकदा टोकाचे मतभेदही झाले. मात्र, त्यातून मनभेद होणार नाही, याची काळजी दोघांनीही घेतली. त्यांच्यातील सुसंवाद आयुष्यभर कायम राहिला. राजकीय स्पर्धा आणि सुसंवादाचे हे अनोखे ‘मॉडेल’ अनेक वर्षे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असायचे.

Shankarrao Kale &Shankarrao Kolhe
फडणवीस लढणारा "कोरोनायोद्धा', शंकरराव कोल्हे यांच्याकडून काैतुक

(कै.) काळेंचे कोपरगावातून आमदार होण्याचे स्वप्न (कै.) कोल्हेंनी पूर्ण होऊ दिले नाही. ते शेवटपर्यंत अपराजित आमदार म्हणून ओळखले जायचे. मात्र, माजी आमदार अशोक काळे वडिलांचे स्वप्न पूर्ण करून विधानसभेची पायरी चढले. पुढच्या निवडणुकीत (कै.) कोल्हे यांच्या स्नुषा स्नेहलता कोल्हे आमदार झाल्या, तर मागील निवडणुकीत (कै.) काळे यांचे नातू आमदार आशुतोष काळे विधानसभेत गेले. जवळपास साठ-सत्तर वर्षांच्या या राजकीय संघर्षात या दोन्ही नेत्यांनी आपल्यातील सुसंवाद कायम ठेवला. कदाचित हे राज्यातील एकमेव उदाहरण असावे. त्यावर भाष्य करताना राजकीय जाणकार गमतीने म्हणायचे, की काळे आणि कोल्हे दिवसा एकमेकांच्या विरोधात भाषणे करून सभा गाजवतात आणि रात्री उसाचा भाव ठरविण्यासाठी एकत्र येऊन चर्चा करतात.

गोदावरी कालव्यांच्या पाणीप्रश्नावरून (कै.) काळे व (कै.) कोल्हे एकत्र आले आणि आपापल्या कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटण्यासाठी थेट विधिमंडळात गेले. विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना विलासराव बाहेर आले. त्यांच्याभोवती आमदारांचा गराडा पडला.

Shankarrao Kale &Shankarrao Kolhe
रामदास आठवले यांनी सांगितल्या शंकरराव कोल्हे यांच्या आठवणी

कोल्हे पुढे झाले आणि त्यांना म्हणाले, की अहो विलासराव, तब्येत बरी नसताना काळेसाहेब तुम्हाला भेटायला आले आणि तुम्ही आम्हाला ताटकळत बसवत आहात. विलासराव घाईने आत येऊन काळेंच्या तब्येतीची विचारपूस करू लागले. त्यावर ते म्हणाले, की तब्येत उत्तम आहे. तुम्ही फार धावपळ करीत आलात. मुळात आम्हाला जरा सवडीने वेळ दिली असती तरी चालले असते. विलासराव मिस्कील हसले. त्यांनी कोल्हे यांच्याकडे पाहून अक्षरशः दोन्ही हात जोडले आणि म्हणाले, की कोल्हेसाहेब, तुम्हाला फारच काळजी दिसतेय काळेसाहेबांच्या तब्येतीची. अर्थात, नंतर तासाभराची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com