Dr. Sujay Vikhe Patil : नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या उड्डाणपुलावरून खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांना वाहनातून सफर घडविली. हे वाहन स्वतः खासदार विखे पाटील यांनी चालवत उड्डाणपुलावरून वाहन चालविण्याचा आनंद घेतला. या वेळी उड्डाणपुलावर उपस्थित पत्रकारांशी बोलताना खासदार विखे पाटलांनी या उड्डाणपुलाचे उद्घाटन कधी व कसे होणार याबाबत माहिती दिली.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, नगरकरांची एक स्वप्न पूर्ती झाली आहे. खासदार या नात्याने मी व आमदार या नात्याने संग्राम जगताप यांनी जो संकल्प केला तो संकल्प आज पूर्ण होताना दिसत आहे. याचा आनंद आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वर्गीय माजी खासदार दिलीप गांधी व नगर शहरातील नागरिकांचे आभार व्यक्त करतो. मागील दोन वर्षांत अनेक अपघात झाले. मात्र लोकांनी सहकाऱ्याची भूमिका घेतली. हा नगरकरांच्या सहकाऱ्याचा व पेश्नसचे हे फळ आहे. ट्रॅफिकमुक्त नगरकडे आपण वाटचाल करत आहोत. नितीन गडकरी यांच्या हस्ते १९ नोव्हेंबरला या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरपासून नगरकरांसाठी हा उड्डाणपूल खुला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहराचा मानबिंदू ठरेल अशा या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच नगरकांना या उड्डाणपुलावरून ये-जा करता येणार आहे. नगर शहरात येणाऱ्या प्रवाश्यांचा वेळ यामुळे वाचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी आशिष असाटी, उपकार्यकारी अभियंता प्रफुल्ल दिवाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उड्डाणपुलावर आतषबाजी
नगर शहरातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या दिवशी रात्री उड्डाणपुलावर आतषबाजी करण्यात येणार आहे. या संदर्भात खासदार विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ही आतषबाजी नगरकरांना पाहता येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.