मला नगर जिल्ह्यात कोणी मित्र नाही

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांची विशेष मुलाखत 'सरकारनामा'ने घेतली.
Dr. Sujay Vikhe Patil News, Ahmednagar News
Dr. Sujay Vikhe Patil News, Ahmednagar NewsSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांची विशेष मुलाखत सरकारनामाने घेतली. या मुलाखतीत त्यांना तुमचे जवळचे मित्र कोण असे विचारल्यावर त्यांनी संसदेतील त्यांच्या मित्रांची नावे सांगितली. मात्र अहमदनगर जिल्ह्यात जवळचा राजकीय व्यक्ती मित्र नसल्याची कबुलीही दिली. ( Sujay Vikhe said, I have no friends in Nagar district )

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुलाखतीत सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे मित्र असल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादीचेच युवा आमदार रोहित पवार हे शत्रू नसल्याचे कबुल केले. मात्र त्यांना जवळचे मित्र विचारल्यावर त्यांनी सांगितले की, "संसदेत आम्ही समवयस्क असलेले खासदार एकत्र असतो. आमचा एक ग्रुप तयार झाला आहे. मी व धैर्यशील माने बेस्टफ्रेंड झालो. मी, धैर्यशील माने, प्रितम मुंडे, रक्षा खडसे, हिना गावित, भारती पवार असा ग्रुप आहे. भारती पवार मंत्री झाल्यामुळे त्या ग्रुपच्या बाहेर गेल्या. आम्ही एका वयोगटातील असल्यामुळे हा ग्रुप झाला," असे त्यांनी स्पष्ट केले. (Ahmednagar News)

Dr. Sujay Vikhe Patil News, Ahmednagar News
बाळासाहेब थोरातांच्या घरात कोणाशी बोलायचे हा माझ्यासमोर प्रश्न

ते पुढे म्हणाले की, "धैर्यशील माने यांना ओळखी वाढवायला आवडतात. त्यांचे घर माझ्या दिल्लीतील घराखालीच आहे. तेथे नेहमीच लोकांचा राबता असतो. धैर्यशील माने यांच्या सारखे मी राजकीय लोकांच्या ओळखी वाढवत नाही. कारण मला राजकारणात राजकीय मैत्रिचा कधीही फायदा झालेला नाही. उलट माझा वापर झाला आहे," असा आरोपही त्यांनी केला.

Dr. Sujay Vikhe Patil News, Ahmednagar News
2024मध्ये सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके अशी लढत होणार का?

"मला मन मारून मैत्री करणे आवडत नाही. माझ्या स्पष्ट वक्तेपणाचा त्रास मला त्रास होतो. माझे वागणे बदलायचे असेल तर लोकांनी मला पराभूत करावे लागेल. यश मिळते तोपर्यंत का बदलावे. अपयश आल्यावर बदल करावे लागतात," असे मिश्किल भाष्यही त्यांनी केले.

नगर जिल्ह्यात तुमचा मित्र कोण यावर विचारले असता त्यांनी सांगितले की, "संसदेतील मित्रांसारखी नगर जिल्ह्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीशी घनिष्ट मैत्री नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. ते नेते आहेत. मित्र असू शकत नाहीत. ते मित्र म्हणून मला वागवितात हा त्यांचा मोठेपणा आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com