कुकडीचे सुटणार उन्हाळी आवर्तन : राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली.
Ram Shinde News, Rohit Pawar News
Ram Shinde News, Rohit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. आले. पावसाळा तोंडावर आला असताना हे आवर्तन सोडण्यात आल्याने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली. ( Summer cycle of Kukdi project to be released: Ram Shinde criticizes Rohit Pawar's planning )

यंदा हिवाळ्यातील वातावरणीय बदलामुळे उसाला तुरे आले. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. अशातच उसाला पाणी नसल्याने शेतकऱ्यांची चिंता द्विगुणीत झाली. राम शिंदे यांनी हा प्रश्न घेऊन आंदोलन केले. त्यानंतर उशिरा का होईना कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन सोडावे यासाठी रोहित पवार यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. (Rohit Pawar News)

Ram Shinde News, Rohit Pawar News
शरद पवार व रोहित पवारांनी अहिल्यादेवी होळकरांची जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न केला - राम शिंदे

उन्हाळी एका आवर्तनानंतर पुन्हा आवर्तनाची मागणी होत असतानाही कुकडीचे आवर्तन सुटले नाही. अखेर पावसाळा तोंडावर असताना आवर्तन सोडण्यात येणार आहे. या कुकडीच्या नियोजनावर व आमदार रोहित पवार यांच्यावर राम शिंदे यांनी शेल्की शब्दात टीका केली.

राम शिंदे यांनी सोशल मीडियावर म्हंटले आहे की, मी काल ( 8 जूनला ) भारतीय जनता पार्टीतर्फे विधानपरिषदेसाठी फॉर्म भरला आहे. काल कर्जत-जामखेडमध्ये बहुतेक ठिकाणी पाऊस पडला. पावसाळा ( 7 जून नंतर ) सुरू झाला आहे, पण उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना कुकडीच्या आवर्तनाची गरज असताना पाणी सुटले नाही. परिणामी बरेच उभी पिके जळाली फळबागाचे नुकसानही झाले. काही ठिकाणी बागा जळाल्या. पण काल असे समजले की कुकडीचे आवर्तन सुटणार आहे मग याला काय समजावे. योगायोग... नियोजन... की परिणाम...?, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.

Ram Shinde News, Rohit Pawar News
रोहित पवारांचे पडळकरांना सडेतोड उत्तर : म्हणाले...

हे आवर्तन उन्हाळ्यात हवे होते. लोकांची पिके जळू लागली आहेत. उन्हाळ्यात दोन आवर्तने होतात. आमचे नेते राम शिंदे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यावर. घाई गडबडीत पावसाळ्याच्या तोंडावर हा निर्णय झाला. इकडे दोन पाऊस पडून गेल्यावर आवर्तन सुटणार आहे.

- सचिन पोटरे, अहमदनगर जिल्हा सरचिटणीस, भाजप.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com