सुप्रिया सुळे यांनी साखर कारखान्‍यांच्‍या विक्रीबाबतही बोलले पाहिजे : विखे पाटील

खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप व पंतप्रधान मोदींवर टीका केली. या टीकेला भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी प्रतिउत्तर दिले.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - दिल्लीत लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी कोरोना उपाय योजनांबाबत महाराष्ट्र व महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिउत्तर दिले. सुळे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप व पंतप्रधान मोदींवर टीका केली. या टीकेला भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी प्रतिउत्तर दिले. ( Supriya Sule should also talk about the sale of co-operative sugar factories in the state. )

लोकसभेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा महाविकास आघाडीचे नेते फायदा घेतात मात्र त्यांचे आभार मानत नाहीत. त्यांचा फोटो योजनेच्या कार्यक्रमात लावत नाहीत, असे सांगताना महाविकास आघाडी वर टीका केली होती. यावर खासदार सुळे यांनी लोकसभेतील भाषणात म्हणाल्या होत्या की, खासदार विखेंनी चांगले भाषण केले. मात्र खाल्लेल्या मीठाला जागावे. त्यांनी त्यांचा इतिहास विसरू नये. विखे पाटील या पूर्वी 10 वर्षे आघाडी सरकारमध्ये होते, असे सांगितले होते. यावरून विखे-पवार कुटुंबातील संघर्ष पुन्हा उफाळून वर आला आहे. खासदार सुळेंच्या पंतप्रधान मोदी व विखे कुटुंबावर केलेल्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Video: "महाराष्ट्राबाबत मोदींच वक्तव्य प्रचंड वेदणा देणारं होतं",सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्‍ये व्‍यक्‍त केलेल्‍या प्रतिक्रियेवर प्रथमच भाष करताना आमदार विखे पाटील म्‍हणाले की, खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्व इतिहास जागृत करायला हवा होता. स्‍व. राजीव गांधी यांनी पक्षात घेवून तुम्‍हाला मुख्‍यमंत्री केले त्‍याच काँग्रेसच्‍या पाठीत खंजीर खुपसून वेगळा पक्ष काढल्‍याचे काळाच्‍या ओघात तुम्‍ही विसरलात का? असा प्रश्‍न करतानाच खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी जो नेमका प्रश्‍न लोकसभेत उपस्थित केला त्‍या राज्‍यातील सहकारी साखर कारखान्‍यांच्‍या झालेल्‍या विक्रीबाबतही त्‍यांनी बोलले पाहिजे.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेली टीका राज्‍यातील काँग्रेस नेत्‍यांना एवढी बोचली असेल तर कोव्‍हीड संकटात केलेल्‍या मदतीची श्‍वेतपत्रिका महाविकास आघाडी सरकारने काढावी. आपले अपयश झाकण्‍यासाठी प्रधानमंत्र्यांच्‍या भाषणाबद्दल गैरसमज पसरविण्‍याचे काम करणारे आघाडी सरकार कोव्‍हीड संकटात कुठे होते असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.

Radhakrishna Vikhe Patil
संसदेत सुजय विखे व सुप्रिया सुळे यांच्यात झाली खडाखडी

आमदार विखे पाटील पुढे म्हणाले की, प्रधानमंत्र्यांचे वक्‍तव्‍य कुठेही महाराष्‍ट्राच्‍या विरोधात नाही. कोव्‍हीड संकटात राज्‍य सरकार कोणत्‍याही समाज घटकाला मदत करु शकले नाही. आपल्‍यावरची जबाबदारी टाळण्‍यासाठीच राज्‍यातील परप्रांतीय कामगारांना पाठवून देण्‍यासाठी कॉंग्रेस नेत्‍यांनी पुढाकार घेतला ही वस्‍तुस्थिती आहे. जे काँग्रेस नेते आज प्रधानमंत्र्यांवर टीका करीत आहेत ते या संकटाच्‍या काळात फक्‍त मुंबईत बसून राहिले. फेसबुकवर संवाद साधत होते, केंद्राच्‍या मदतीवरच अवलंबून राहिले, मात्र केंद्राने दिलेल्‍या मदतीचाही यांना योग्‍य विनीयोग करता आला नसल्‍याचे दुर्दैव त्‍यांनी बोलून दाखवि‍तानाच रोज माध्‍यमांपुढे येवून पोपटपंची करणाऱ्या संजय राऊतांनी किती कोव्‍हीड सेंटर उभारले असा प्रश्‍नही त्‍यांनी उपस्थित केला.

महसूल मंत्री आज प्रधानमंत्र्यांवर टीका करतात परंतु त्‍यांच्‍या तालुक्‍यात एकही कोव्‍हीड सेंटर सुरु होवू शकले नाही. 46 खासगी रुग्‍णालयांना परवानगी देवून नागरिकांना वाऱ्यावर सोडले. स्‍वत:चे अपयश झाकण्‍यासाठी केंद्रावर टीका करण्‍याची फॅशन झाल्‍याची टीका आमदार विखे पाटील यांनी काँग्रेस नेत्‍यांवर केली.

Radhakrishna Vikhe Patil
Video: काॅंग्रेस नसती तर लोकशाही ही घराणेशाहीमुक्त झाली असती; नरेंद्र मोदी

राज्‍यात आघाडी सरकारच्‍या भ्रष्‍टाचाराची लक्‍तरे आता बाहेर येवू लागली आहेत. भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपण्‍याचे काम सुरु झाले आहे. पुणे येथे किरीट सोमय्या यांच्‍यावर झालेला हल्‍ला हा पूर्व नियोजित आणि आघाडी सरकार पुरस्‍कृतच होता. भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधातील ही लढाई थांबणार नाही. किरीट सोमय्याही शांत बसणार नाहीत. सरकारच्‍या विरोधात बोलणाऱ्या 12 निलंबित आमदारांबाबत सर्वोच्‍च न्‍यायालयाने सरकारला फटकारले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि आमदार नितेश राणे यांना होत असलेला त्रास पाहाता सत्‍तेचा केवळ गैरवापर सुरू आहे. मात्र विरोधकांना नामोहरम करण्‍यात आघाडी सरकार यशस्‍वी होणार नाही, असे आमदार विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com