Pawar Vs BJP : पवारांनी फडणवीसांचा दावा फेटाळल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याने केली आगळी वेगळी मागणी

महाराष्ट्रातील जनतेने आजपर्यंत शरद पवारांना पाहिलं आहे.
Shrikanth Bharatiya - Sharad Pawar -  Devendra Fadnavis
Shrikanth Bharatiya - Sharad Pawar - Devendra Fadnavis Sarkarnama

Solapur News : पहाटेच्या शपथविधीवरून राज्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) म्हणणे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) नाकारल्यानंतर फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याने वेगळीच मागणी केली आहे. पवारांच्या शब्दावर विश्वास की फडणवीसांच्या शब्दावर याचा एकवेळ महाराष्ट्रात सर्वे होऊन जाऊ द्या, अशी आगळी वेगळी मागणी भाजपचे आमदार तथा प्रदेश संयोजक श्रीकांत भारतीय (Srikanth Bharatiya) यांनी केली आहे. (Survey the trustworthiness of Sharad Pawar and Devendra Fadnavis : Srikanth Bharatiya)

Shrikanth Bharatiya - Sharad Pawar -  Devendra Fadnavis
Raju Shetti : तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली 'ती' ऑफर राजू शेट्टींनी नाकारली; दिलं 'हे' कारण

महाराष्ट्रातील साडेतेरा कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास आहे. पवारांच्या शब्दावर त्यांच्या घरच्या लोकांनही विश्वास नाही, असं म्हणत भारतीय यांनी शरद पवारांना टोमणा लगावला. पहाटेचा शपथविधी पवारांच्या सल्ल्यानेच झाला, हे शरद पवार आज जरी फेटाळत असतील, तरी महाराष्ट्रातील जनतेने आजपर्यंत शरद पवारांना पाहिलं आहे. त्यामुळं जनता ठरवेल त्यांच्या कोणत्या शब्दावर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द हा क्रिस्टल क्लिअर साफ असतो आणि तो सत्य असतो. विरोधी पक्षनेते अजित पवार हेही पवारच असल्यामुळे ते नंतर बदलले, असं म्हणत श्रीकांत भारतीय यांनी अजित पवारांवर मिश्किल टीका केली.

Shrikanth Bharatiya - Sharad Pawar -  Devendra Fadnavis
Supreme Court Hearing : कपिल सिब्बलांच्या युक्तीवादावर न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांचे महत्त्वाचे विधान...

भाजप महाविजय २०२४ चं प्रदेश संयोजकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आमदार श्रीकांत भारतीय हे पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील मागणी केली. ते म्हणाले की, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेऊन नव्या कामाची सुरुवात केली आहे. दरम्यान, सोलापुरात श्रीकांत भारतीय यांनी उदय पाटील यांच्या घरी नाश्ता घेतला.

Shrikanth Bharatiya - Sharad Pawar -  Devendra Fadnavis
Shiv Sena News : हरीश साळवेंच्या युक्तीवादावर कपिल सिब्बलांचा जोरदार आक्षेप

महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा भाजप निवडून आणेल, त्यामुळे तयारी ही १०० टक्के आहे. निवडणुकीच्या अगोदर दीड ते दोन वर्ष अगोदरपासून तयारी सुरु आहे. सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय न्यायालयात असल्याने त्यावर बोलणं उचित नाही, मात्र, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायालयाच्या निकालानंतर लोकसभेच्या उमेदवाराबद्दल निर्णय घेतला जाईल.

Shrikanth Bharatiya - Sharad Pawar -  Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पहाटेचा शपथविधी पवारसाहेबांच्या सहमतीनेच; फडणवीसांच्या दाव्याने राज्यात खळबळ

‘तेव्हा माझी वाक्ये लक्षात येतील’

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघ आम्ही जिंकू. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार विजयी होतील. जेव्हा लोकसभा आणि विधानसभेचे सर्व निकाल हाती येतील, तेव्हा तुम्हाला ही माझी वाक्य लक्षात येतील, असेही आमदार श्रीकांत भारतीय यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com