संजय राऊतांवरील कारवाईही ब्लॅकमेल करण्यासाठी...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी ईडी व भाजपवर जोरदार टीका केली.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी ईडी व भाजपवर जोरदार टीका केली. संगमनेर येथे एका आयटी कंपनीच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ( The action against Sanjay Raut is also for blackmailing... )

नाना पटोले म्हणाले, त्यांचे पाप लपविण्यासाठी ईडीच्या कारवाया करणे हे काही नवीन नाही. महागाई व भाजप बाबत तरुणांत उद्रेक झाला म्हणून खोटी कागदपत्रे दाखवून राहुल गांधींना ईडीच्या कार्यालयात बोलावले व वातावरण बदलून टाकले. मूळ विषयाला कशी कलाटणी द्यावी यात भाजप एक्सपर्ट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Nana Patole
Mumbai : राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा : नाना पटोले

ते पुढे म्हणाले, भाजपने निश्चित केले आहे की, केंद्र सरकारच्या देश विकणाऱ्या व संविधान व्यवस्था संपुष्टात आणणाऱ्या धोरणा विरोधात जो कोणी बोलेल त्याच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. अशा इंग्रजांच्या पद्धतीची अंमलबजावणी भाजप सरकार करत आहे. त्यामुळे संजय राऊतांवरील कारवाई ही नवीन नाही.

संजय राऊतांवरील कारवाईही ब्लॅकमेल करण्यासाठी झाली आहे. त्यामुळे त्यांनी किती अन्याय करावा. किती लोकांना तुरुंगात टाकायचे हे त्यांनी ठरवावे. मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखानामुळे देशातील जी लोकशाही मजबूत आहे. त्या लोकशाहीला ते एवढ्या सोप्या पद्धतीने हरवू शकणार नाहीत. जेव्हा निवडणुका येतील त्यावेळी त्यांना या देशातील जनता जागा दाखवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Nana Patole
Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणी ED ची टीम थेट राऊतांच्या घरी पोहोचली

कोश्यारींवर टीका

भाजप किती दिवस खोटे बोलेल. लोकांना ब्लॅकमेल करेल. यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे राज्यपालांनी जो भाव, जो महाराष्ट्राच्या पाठीवर खंजीर खुपसला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्याला महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही.

भाजपचा विचार हा तोडा व राज्य करा असा आहे. या गोष्टीला आता महाराष्ट्रातील जनता समजून आहे. कोश्यारींनी केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अपशब्द बोलले. त्यांनी एक प्रकारे देशाचा अपमान केला आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आहेत. अशा माणसाला भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नेमून भाजपचे कार्यालय उघडले आहे. त्यांनाही महाराष्ट्रातील जनता जागा दाखवायला मागे-पुढे पाहणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com