Praniti Shinde News: काँग्रेस सोलापुरातील पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीत; 'भावी खासदार'चा झळकला 'बॅनर' !

Solapur Congress Vs BJP Politics : सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसची रणनीती
Banner in Solapur
Banner in SolapurSarkarnama

Solapur Political News: लोकसभा निवणुकीत भाजपला तोडीस तोड उमेदवार देण्याची तयारी काँग्रेसने तयारी सुरू केलेली आहे. भाजप सोलापूर मतदारसंघासाठी नवा चेहरा देणार असल्याचे बोलले जात आहे. यातच सोलापूरसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीत निमंत्रित सदस्य म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांची वर्णी लागलेली आहे. त्यानंतर आता काँग्रेस भवनासमोर 'आमदार प्रणिती शिंदे भावी खासदार' असा मोठा फलक लावण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी बाजी मारणाऱ्या भाजपपूर्वीच सोलापूरमध्ये काँग्रेसने बाजी मारल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (Latest Political News)

सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दोनदा पराभव झाला. भाजपच्या नवख्या उमेदवारांकडून त्यांचा पराभव झाल्याने ही बाब काँग्रेसच्या जिव्हारी लागली आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पार पडणार असली तरी ते स्वत: उमेदवार नसणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपल्या पराभवाचा वाचपा काढून हातातून निसटलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसला तगडा उमेदवाराचा शोध आहे.

Banner in Solapur
Jitendra Awhad Target Chhagan Bhujbal ; "ज्यांचं खाल्लं...त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताहेत ; आव्हाडांनी भुजबळांना सुनावले..

आता देशातील आणि राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचा विचार करता महायुतीसमोर काँग्रेसचा नवखा उमदेवार टिकणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या माध्यमातून काँग्रेसला यश मिळू शकते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्याचाच भाग म्हणजे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आमदार प्रणिती शिंदे भावी खासदार म्हणून मोठा बॅनर लावला आहे. माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा ४ सप्टेंबरला वाढदिवस आहे. या निमित्ताने लावलेला बॅनर सर्वांचे लक्ष वेधत आहे.

Banner in Solapur
Chitra Wagh Reply To Thackeray : उद्धवजी…! तुमची मशाल अन्याय जाळून टाकणारी नव्हे, तर...'', चित्रा वाघ कडाडल्या

आता आमचं ठरलयं !

भाजपकडून सुशीलकुमार शिंदेंचा सलग दोनदा झालेला पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. खासदार असूनही भाजपने सोलापूरकडे दुर्लक्ष केल्याची टीका काँग्रेसच्या गोटातून होत असते. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंचा बदला आता प्रणिती शिंदे घेतील. विरोधात कोणीही असो आता आमचे ठरले आहे की त्या उमेदवाराचा पराभव करणारच! असा दावा करून सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. या फलकातून त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे जाणकार सांगतात.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com