Sangli News : विकास कामाची फाईल भर सभागृहात टराटरा फाडली; दोन नगरसेवकांमध्ये तुंबळ खडाजंगी!

Sangli Municipal News : "मी फायली फाडल्या हे खरं आहे. मात्र यामध्ये मी काही चुकीचं काम केलं आहे, असे मला वाटत नाही.’"
Sangli News :
Sangli News :Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Municipal News : सांगली महापालिकेत आपल्या फायली सरकवण्याच्या राजकीय संघर्षाने वेगळेच वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या नगरसेवकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाची चक्कं विकास कामाची फाईल भर सभेतच टराटरा फाडून फेकून दिली. भाजप नगरसेवक विवेक कांबळे (Vivek Kamble) यांनी हे कृत्य केले आहे. एकीकडे विकास कामे रेंगाळून राहत आहेत, त्यात नगरसेवकांच्या अशा कृत्याने अधिकारी, इतर सदस्य अवाक झाले. (Latest Marathi News)

ज्यांची फाईल फाडून फेकून देण्यात आले ते राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात (Yogendra Thorat) यांनी सभागृहात महापौर आणि प्रशालनाला फैलावर घेतले होते. महापौरांचा कोट्यवधींचा निधी खर्च केला गेला. सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचीही कामे मंजूर करण्यात आली. मात्र नगरसेवकांची अवघे २० लाखांची कामांनी अद्याप मंजूरी दिली जात नाही.

अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. मुख्य लेखापाल मागील आठ दिवसांपासून रजेवरच आहेत. त्यांच्या कामाची जबाबदारी अन्य कोणावरही दिली गेली नाही. त्यांच्या सहीसाठी-संमतीसाठी विकास कामे अडून पडली आहेत. विशिष्ट लोकांची कामे होत असताना, नगरसेकांच्या कामाला ब्रेक लावले गेले आहे. यासाठी कुणाला जबाबदार धरायचे? असा सवाल नगरसेवक थोरातांनी उपस्थित केला.

Sangli News :
Sangli News : जयंतरावांच्या सांगली महापालिकेत सकाळी अजितदादांचा फोटो लावला अन्‌ सायंकाळी काढला!

पदाधिकारी नगरसेवकांचे खासगी साहाय्यक, शिपाई नाहीत. यामुळे नगरसेवकांना स्वत:लाच फाईल घेऊन येरझाऱ्या मारावे लागत आहे. मात्र अधिकारी हे योग्य रितीने आणि वेळेत काम करीत नाहीत, असे थोरात म्हणाले. अशा कामांचा दाखला देत थोरात यांनी फाईल सादर करण्याचा प्रयत्न केला. नेमके यावेळी भाजप नगरसेवक विवेक कांबळे सभागृहात दाखल झाले, यामुळे थोडी खडाजंगी झाली.

थोरात यांची वागणे बेकायदेशीर असल्याचे सांगत कांबळे म्हणाले, ‘अशा फायली स्वत: नगरसेवकाने घेऊन येणे बेकायदेशीर आहे .ते आता नगरसेवक आहेत की शिपाई?’ यामुळे हा वाद विकोपाला गेला. दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. महापौर यांनी दोन्ही सदस्याने शांत राहण्याची विनंती केली.

मात्र दोघांमधील खडाजंगी वाढतच गेली. इतर सदस्यांनी मध्यस्थिचा प्रयत्न केला. अशा फाईली सभागृहात आणल्या तर ते फाडून टाकू असे कांबळे म्हणाले, याला आव्हान देत थोरात यांनी आताच फाडा असे आव्हान दिले. यानंतर कांबळे यांनी थोरात यांची फाईल भर सभागृहात टराटरा फाडली.

यावरे बोलताना नगरसेवक थोरात म्हणाले, ‘माझ्या प्रभागातील मी केलेली विकास कामे विरोधकांना बघवत नाहीत. यात ते नेहमी वेगवेगळ्या मार्गाने अडचणी आणत असतात. पण मी काही मागे हटणार नाही. यापुढे असेच काम करून, विरोधकांना प्रत्युत्तर देणार आहे. माजी महापौरांचे हे वर्तन त्यांच्या पदाला शोभणारे नाही.आज फाडलेल्या फायलींसह सर्व विकासकामे विहित वेळेत पूर्ण करून दाखवण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे.’

Sangli News :
Ahmednagar News : नगरमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले; सक्षम पोलीस अधीक्षक द्या; राष्ट्रवादीची अजित पवारांकडे मागणी!

फाईल फाडल्याच्या कृतीवर कांबळे म्हणाले, ‘प्रशासकीय संबंधातली फायली नगरसेवकांनी- सदस्यांनी सभागृहात घेऊन येणे, हे चुकीचे आणि नियमबाह्य आहे. संबंधित नगरसेवकाने कामांच्या मंजुरीसाठी ॲट्रॉसिटी कायद्याचा भीती अधिकाऱ्यांना घालतात. मी फायली फाडल्या हे खरं आहे. मात्र यामध्ये मी काही चुकीचं काम केलं आहे, असे मला वाटत नाही.’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com