Akole Nilwande Dam : सरकार बदललं अन् नशिबाने 'त्यांना' कालव्यांच्या चाचणीची संधी मिळाली; थोरातांंचा शिंदे-फडणवीसांना चिमटा..

Balasaheb Thorath News : "आपण काम केले पण कामाची कधीही प्रसिद्धी केली नाही.."
Akole Nilwande Dam :  Balasaheb Thorath News : Ahmednagar News
Akole Nilwande Dam : Balasaheb Thorath News : Ahmednagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल बहुप्रतीक्षित निळवंडे धरणातील पाणी कालव्यात सोडण्याची चाचणी पार पडली. तब्बल ५३ वर्षे पाण्यासाठी वाट पहावी लागलेल्या नगर-नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १८२ गावांसाठी ३१ मे हा आनंदाचा दिवस होता. कालव्याच्या माध्यमातून या भागात पाणी वाहणार असून त्यामुळे ६८,८७८ हेक्टर क्षेत्रातील शेती फुलणार आहे. (Latest Marathi News)

निळवंडे धरण आणि उजवा-डाव्या कालव्यांची एकूणच कामे खूपच दीर्घकाळ रखडली. मात्र अखेर डाव्या कालव्यातून चाचणीच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले. जेष्ठ नेते मधुकरराव पिचड, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे कधीकाळी एकाच पक्षात तर काळाच्या ओघात वेगवेगळ्या पक्षात गेलेल्या नेत्यांच्या भोवतीच निळवंडे हा विषय रेंगाळला आणि नेहमीच राजकीय मुद्दा राहिला.

Akole Nilwande Dam :  Balasaheb Thorath News : Ahmednagar News
Shirur Loksabha: या मातब्बर नेत्याला NCP रिंगणात उतरवण्याच्या तयारीत | Dilip Walse Patil |Amol Kolhe

अर्थात आता पाणी सोडण्यात आल्याने कामाचे श्रेय कुणाकुणाचे हा विषय आता चर्चेत आला आहे. याबाबत निळवंडे कामात निश्चितच महत्वाची भूमिका असलेले कांग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आनंद व्यक्त करतानाच सरकार बदलल्याने चाचणी घेण्याची संधी 'त्यांना' मिळाली असे म्हणत, खंत व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे थोरातांना कार्यक्रमाचे निमंत्रणही नसल्याचे बोलले जात आहे.

"अनेक अडचणीवर मात करून आपण निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. काम कोणी केले हे जिल्ह्यासह राज्यातील सर्व जनतेला माहित आहे. सरकार बदलले आणि नशिबाने त्यांना कालव्यांची चाचणी घेण्याची संधी मिळाली. हे धरण व कालव्यांसाठी केलेले कष्ट मोठे असून, या कष्टानंतर दुष्काळी जनतेला पाणी मिळते आहे. याचा आपल्याला आनंद आहे. सर्व दुष्काळ भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येईल, तो आपल्या जीवनातील स्वप्नपूर्तीचा दिवस असेल, असे प्रतिपादन मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

Akole Nilwande Dam :  Balasaheb Thorath News : Ahmednagar News
Bharatshet Gogawale Birthday: ओ भरतशेठ, तुम्ही नादच करताय थेट, तुमचा ‘बर्थ डे' लईच बेस्ट ; पण जी- 20 ची तयारी होतेय वेस्ट !

"निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडलेल्या पाण्याच्या चाचणीनंतर ते म्हणाले की, "हा माझ्यासह सर्व शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचा दिवस आहे. 1999 मध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपण निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प राबवून प्रकल्पग्रस्तांना संगमनेर तालुक्यात चांगल्या जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये चांगल्या नोकऱ्या दिल्या. काम तातडीने होण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन भिंतीचे काम पूर्ण केले. याचवेळी कवठे कमळेश्वर, गणेशवाडी, पिंपळगाव कोंझिरा या मोठमोठ्या बोगद्यांसह कालव्यांची कामे पूर्णत्वास आणली. मात्र 2014 ते 2019 या काळात कामे थंडावली होती," असे ही थोरात म्हणाले.

"महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येतात मोठा निधी मिळून रात्रंदिवस कामे सुरू ठेवली. कोरोना महामारीतही हे काम अविरतपणे सुरू होते. ऑक्टोबर 2022 मध्येच पाणी देण्याचे आपले स्वप्न होते. त्यासाठी विविध प्रश्न सोडवत जलद गतीने काम केले. आपण काम केले पण कामाची कधीही प्रसिद्धी केली नाही, असा दावाही थोरात यांनी केला.

Akole Nilwande Dam :  Balasaheb Thorath News : Ahmednagar News
Sushma Andhare News : ''...तर मग शिरसाटांना 'क्लिनचीट' कशी दिली?''; अंधारेंचा फडणवीसांना संतप्त सवाल

"काम अंतिम टप्प्यात आले असताना सरकार बदलले. नशिबाने त्यांना चाचणी घेण्याची संधी मिळाली. हा प्रश्न श्रेय वादाचा विषय नसून दुष्काळ भागातील जनतेला पाणी मिळते आहे, याचा आनंद आहे . सध्या भंडारदरा आणि निळवंडे धरण मिळून 10 टीएमसी पाणी शिल्लक आहे. चाचणी घेतली नसती तर हे पाणी वाया गेले असते. म्हणून आपण 23 मे 2023 रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हे आनंददायी आहे, तरीही 182 गावातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाईल तो आपल्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असेल," असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com