लोणंद : जिल्ह्यात कधीच जातीपातीचे व धर्माचे राजकारण झाले नाही. आम्ही विचारांच्या मागे जाणारी माणसे आहोत. सातारा जिल्ह्याची तीच परंपरा आहे. मात्र, अलिकडे यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात राजकीय दुर्गंधी पसरली आहे. धर्माच्या नावाखाली गुन्हेगारांच्या टोळ्यासारखे पक्ष चालवणारे लोकहिताची भाषा करत आहेत, हे आपले दुर्दैव आहे, अशी टीका विधान परिषदेची माजी सभापती आमदार रामराजे नाईक- निंबाळकर यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बावडा (ता. खंडाळा) येथे आयोजित केलेल्या जनसंपर्क अभियान मेळाव्यात माजी सभापती रामराजे बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, बाळासाहेब सोळसकर आदी उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘‘चार वेळा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताना शरद पवार यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे राज्यात कृषी, औद्योगिक क्रांती झाली. धरणे, शेतीपाट पाण्याच्या कामांमुळे दुष्काळी भाग सुजलम सुफलम झाले. विकासासाठी जिल्ह्याला राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. यासाठी आपसांतील मतभेद बाजूला ठेऊन एकीने राष्ट्रवादीला साथ द्या.’’
मकरंद पाटील म्हणाले, ‘‘विरोधी जातीवादी पक्ष, काँग्रेसने देशासाठी काय केल्याची विचारणा करून तरुणांची दिशाभूल करत आहेत. मात्र, देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते सुस्त झाले आहेत. पक्षाचे नेते शरद पवार व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.