पारनेरच्या नगराध्यक्षाने शासकीय अधिकाऱ्याला केली मारहाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते असलेले पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी व त्यांच्या समर्थकांनी पारनेर नगरपंचायतमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली.
Vijay Auti- Parner Mayor
Vijay Auti- Parner Mayor Sarkarnama

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील शासकीय वैद्यकीय कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेला सहा महिने होत नाहीत तोच आज नवा प्रकार पारनेर शहरात घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते असलेले पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी व त्यांच्या समर्थकांनी पारनेर नगरपंचायतमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पारनेर तालुका देवरे प्रकरणानंतर पुन्हा एकदा राज्याभर चर्चेचा विषय ठरत आहे. ( The mayor of Parner beats up a government official )

पारनेर नगरपंचायतची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र आमदार नीलेश लंके यांनी अपक्ष नगरसेवकांना बरोबर घेत पारनेर नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणली. नीलेश लंके यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते विजय औटी यांना नगराध्यक्ष करण्यात आले.

Vijay Auti- Parner Mayor
विजय औटीच होणार पारनेरचे नगराध्यक्ष

पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सचिन राजभोज यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये नगराध्यक्ष विजय औटी यांनी मारहाण करत असताना नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीता कुमावत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नगराध्यक्ष औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुनीता कुमावत यांना न जुमानता मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Vijay Auti- Parner Mayor
ज्योती देवरे यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा - देवेंद्र फडणवीस

सचिन राजभोज हे पारनेर नगरपंचायतमध्ये स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता म्हणून काम करतात. पारनेर शहरातील पाणीपुरवठा विभागातील बंद पडलेल्या मोटारी जमा करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ते त्यावेळेस न केल्याने नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मात्र या घटनेमुळे पारनेर तालुका सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

नगराध्यक्षांना एकेरी संबोधनावरून झाला वाद

हंगे तलावातून पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारींचा लिलाव करून नव्या मोटारी खरेदी करा असा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला होता. पारनेर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी नगराध्यक्ष विजय औटी यांची होती. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सचिन राजभोग यांनी त्यावेळी नगराध्यक्ष औटी यांना एकेरी संबोधन केले. त्यामुळे संतप्त नगराध्यक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अभियंता राजभोग यांना मारहाण केल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र या घटनेबाबत कोणीही अजून फिर्याद दिलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com