आक्षेपार्ह होर्डिंग्ज भाजपच्या माजी स्थायी समिती अध्यक्षाला भोवले

छत्रपती शिवाजी महाराजांना या फ्लेक्सवर दुय्यम स्थान देण्यात आले आहे.
hoarding
hoardingsarkarnama

पिंपरी : विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) देशातील सर्वात मोठे पथसंचलन नागपूरात केले जाते. इतरत्रही ते केले जाते. पिंपरी-चिंचवडही त्याला अपवाद नाही. मात्र, त्यानिमित्त भाजपचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी लावलेल्या आक्षेपार्ह होर्डिंग्जवरून मोठे वादळ उठले. सोशल मिडियावर त्यावर शिवप्रेमींच्या अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना या फ्लेक्सवर दुय्यम स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीच्या पद्धतीने फोटो छापून त्यांचा अवमान केल्याबद्दल तसेच समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल मडिगेरींविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक संजय वाबळे, मारुती भापकर, कष्टकऱ्यांचे नेते काशिनाथ नखाते, संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे आदी २२ जणांच्या सह्या या तक्रार अर्जावर आहेत.

hoarding
गाडीत 'शिवाजी महाराज' असल्याने बालाजीला प्रवेश नाकारला? मिलिंद नार्वेकर मंदिराचे विश्वस्त

शिवाजी महाराज आणि आरएसएसच्या या कार्यक्रमाचा काहीएक सबंध नसताना त्यांचा फोटो वापरल्याबद्दल तक्रारदारांचा आक्षेप आहे. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे बेकायदेशीर बॅनर लावण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, पोलिस यासंदर्भात गुन्हा नोंद करण्याच्या मनस्थितीत दिसून न आल्याचे भापकर यांनी नंतर सरकारनामाला सांगितले.

मडिगेरींनी लावलेल्या फ्लेक्सवर प्रथम हेगडेवार आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोटोंचा आकारही सारखाच आहे.भोसरीतील मोशी- प्राधिकरण,इंद्रायणीनगर भागात ते लागले आहेत.त्यावरून शिवप्रेमींत संताप पसरला आहे.त्यांनी तो मडिगेरींना फोन करून व्यक्त केला. त्यामुळे नंतर त्यांना आपला फोन बंद ठेवावा लागला. या वादासंदर्भात सरकारनामानेही त्यांच्याशी आज वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंदच आढळला.

hoarding
Video : शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण

दरम्यान,एकामागोमाग एक असे अनेक शिवप्रेमींचे संतप्त फोन आल्याने मडिगेरींनी पोलिसांत धाव घेतली. तसेच झाल्या प्रकाराबद्दल लेखी माफी मागितली.ही प्रिटिंग मिस्टेक अनावधानाने झाली आहे.महाराज हे महाराज आहेत. जगात कुणाशीही त्यांची तुलना होऊ शकत नाही. भविष्यात अशी चुक होणार नाही,असे मडिगेरींनी माफीनाम्यात म्हटले आहे.तसेच तसेच वादग्रस्त फ्लेक्स काढून टाकल्याचेही त्यांनी सांगितले.मात्र,त्यानंतरही शिवप्रेमींचा संताप कमी झालेला नाही. शिवद्रोही मडिगेरीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत.तो पोलिसांनी दाखल केला नाही,तर भोसरीतील इंद्रायणीनगर चौकात संभाजी ब्रिगेड उद्या आंदोलन करेल,असा इशारा काळे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com