महिला वन कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्याला सोडणार नायं...

सातारा जिल्ह्यात एका महिला वन कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

सातारा - शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी अशा घटना राज्यासह देशात वाढू लागल्या आहेत. यातच सातारा जिल्ह्यात चक्क एका महिला वन कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. The one who beat up a female forest worker will not be released ...

सातारा जिल्ह्यामधील महिला वन कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणी बद्दल राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचे सांगून यामधून आरोपी सुटणार नाही अशी ग्वाही दिली आहे.

Shambhuraj Desai
शंभूराज देसाई म्हणतात, आगामी निवडणुकीतच विरोधकांना 'ट्रेलर' दाखवतो...

शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यातील महिला वनकर्मचारी या व्याघ्र गणनेचे काम करण्यासाठी दोन स्थानिक मजुरांना घेऊन त्या ठिकाणी सरकारी कामकाज करत होत्या. त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जानकर यांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या कामात अडथळा आणला यांना लाथाबुक्क्यांनी मारले, अशा पद्धतीची तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्याकडे काल दिली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत 24 तासांत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Shambhuraj Desai
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक; पाहा व्हिडिओ

ते पुढे म्हणाले की, या गुन्ह्यामध्ये लावलेला आरोपीला कठोर शासन करण्याच्या दृष्टीने जे करावे लागेल ते तपासामध्ये आम्ही करू. शिवाय आरोपी कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाहीत, अशा पद्धतीने कठोर भूमिका ही पोलिस घेतील, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com