Sangola Bazar samiti Election: सत्ताधारी शेकाप, राष्ट्रवादी, शहाजी पाटलांच्या आघाडीला स्वकीयांकडूनच आव्हान: सांगोल्यात प्रस्थापितांचे धाबे दणाणले

Sangola Bazar samiti Election | सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी प्रमुख पक्ष असलेला शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतेमंडळींनीच स्वपक्षाविरुद्ध दंड थोपटले
Sangola Bazar samiti Election:
Sangola Bazar samiti Election:Sarkarnama
Published on
Updated on

दत्तात्रय खंडागळे

Sangola Bazar samiti Election: सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी प्रमुख पक्ष असलेला शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतेमंडळींनीच स्वपक्षाविरुद्ध दंड थोपटले. यांना आरपीआय, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व इतर पक्षाची साथ मिळाली. सत्ताधारी व प्रस्थापितांच्या युतीविरोधात परिवर्तन आघाडी निर्माण झाल्याने ही निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरत आहे. या परिवर्तन आघाडीमुळे सत्ताधारी व प्रस्थापितांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. (The ruling Shekap, NCP, Shahaji Patil's alliance is being challenged by its own people)

या निवडणुकीमध्ये सत्ताधारी शेकाप पक्षाच्या देशमुख घराण्यांसोबत शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी एकत्रित येत निवडणूक लढवली जात आहे. तालुक्यातील राजकीय विरोधक असलेले सर्वच प्रमुख पक्ष एकत्रित आल्याने निवडणूक बिनविरोध होईल किंवा एकतर्फी होईल असेच चित्र निर्माण झाले होते. परंतु सत्ताधारी शेकाप पक्षातील माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी शेकाप पक्षामध्येच समांतर पॅनल उभे केले. (Bazar Samiti Election)

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य असलेले जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांनीही या प्रमुख पक्षाच्या विरोधात शड्डू ठोकला. या प्रमुख पक्षातीलच बंडखोरी झाल्याने या बंडकरांसोबतच तालुक्यातील आरपीआय, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व इतर पक्षही या आघाडीत सामील झाले. या आघाडीने 'दिवंगत गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी' असे नाव देऊन अक्षय तृतीया व रमजान ईदच्या मुहूर्तावर आपला प्रचाराचा नारळही फोडला. या परिवर्तन आघाडीमुळे सत्ताधारी व प्रस्थापित पक्षांपुढे वेगळाच पेच निर्माण झाला आहे. (Shahaji Bapu Patil)

नव्या युती, आघाड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चा

या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे प्रमुख विरोधक असलेले पक्षांनी केलेली युती, प्रस्थापित व सत्ताधारी पक्षाच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील अनेकांनी थोपटलेले दंड, तालुक्यातील इतर पक्षांनी परिवर्तन आघाडीला दिलेला पाठिंबा यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सोशल मीडिया मधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. (Sangola News)

एकमेकांच्या विरोधात नेहमी बोलणारे आज एका स्टेजवर बसून विकासाच्या गप्पा आता कशा मारल्या जाणार याबाबत चर्चा सोशल मीडियावर केल्या जात आहेत. त्यामुळे निवडणूक जरी कृषी उत्पन्न बाजार समितीची असली तरी यापुढील राजकारणाची व तालुक्यातील परिवर्तनाची वेगळी दिशाच या निवडणुकीमुळे निर्माण झाल्याचे चित्र सध्या सांगोला तालुक्यात दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com