शिंदे-फडणवीस सरकार फक्त पैसा आणि 'ईडी'च्या जोरावर सुरु

Supriya Sule: भाजप माझ्याविरोधात सर्व ताकद लावून निवडणूक लढणार याची मला जाणीव आहे.
Supriya Sule Latest News
Supriya Sule Latest NewsSarkarnama

भोर : राज्यातील आताचे सरकार हे केवळ पैसा आणि ईडी (ED) या दोन गोष्टींच्या ताकदीवर सुरु आहे. राज्यात इतक्या खालच्या थराचे राजकारण सुरु आहे. यापूर्वीही सत्तेत बदल झाले परंतु आतासारखी वाईट परिस्थिती नव्हती,अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर केली आहे.

त्या येथील यशवंत लॉन्स मंगल कार्यालयात सोमवारी (ता.22 ऑगस्ट) भोर तालुक्याची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दुपारनंतर झालेल्या या आढावा बैठकीस शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी आणि राष्ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी उपस्थित होते.

Supriya Sule Latest News
महाविकास आघाडी स्थापनेसाठी किती खोक्यांचा सौदा झाला?; शहाजी पाटलांचा पलटवार

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपा माझ्याविरोधात सर्व ताकद लावून निवडणूक लढणार याची मला जाणीव आहे. परंतु आम्ही संविधानावर विश्वास ठेवून काम करतो. माझ्याविरोधात कोणत्याही पक्षाचे उमेदवार उभे राहतील आणि त्यांनाही बारामतीचा विकास समजेल. आम्ही त्यांच्यासारखे 'एक देश एक पक्ष' असे बोलत नाही. लोकशाहीनुसार आम्ही एक देश अनेक पक्ष असे समजतो. यशवंतराव चव्हाणांच्या विचारातील सहकारी संघराज्याच्या विरोधात केंद्र सरकार काम करीत आहे.

यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवरही सुळे यांनी टिका केली. केवळ पैसा आणि ईडी या दोन गोष्टींच्या ताकदीवर राज्याचे सरकार सुरु आहे. राज्यात खालच्या थराचे राजकारण सुरु असून यापूर्वीही सत्तेत बदल झाले परंतु आतासारखी वाईट परिस्थिती नव्हती. आता कोण कुठल्या पक्षात आहे. हेच कळेनासे झाले आहे. दोन महिन्यांपासून पालकमंत्री नसल्यामुळे केवळ पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विकासकामे ठप्प आहेत. अजूनही सर्वं मंत्री हे सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा खोचक टोलाही सुळे यांनी लगावला.

Supriya Sule Latest News
Dharmaal Mehram : अमोल मिटकरी म्हणजे, केवळ राजकारणातील थिल्लरपणा...

सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबत विचारले असता सुळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्यासोबत नगरविकास खात्याचे मंत्री असताना त्यांनीच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडावा हे विधेयक मांडले होते. परंतु अडीच वर्षात त्यांनीच नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय का घेतला. याबाबत त्यांनाच विचारा,असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, युवानेते विक्रम खुटवड, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, भालचंद्र जगताप, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, नितीन धारणे, प्रकाश तनपुरे, मनोज खोपडे, वंदना धुमाळ, हसीना शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या बारामतीत आल्यास मी त्यांचे स्वागतच करेन,असेही त्या म्हणाल्या. याबरोबरच जिल्हा सहकारी बॅंकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करून केंद्र सरकार (Central Government) राज्याचे अधिकार काढून घेवून सर्व कंट्रोल आपल्याकडे घेत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com