सासूसाठी भांडण केलं... पण सासूच आली वाटणीला : विनय कोरेंची अवस्था

विनय कोरे यांनी सत्तारूढ पॅनेलमध्ये प्रक्रिया गटातून आसुर्लेकर यांना तीव्र विरोध केला होता.
विनय कोरे
विनय कोरे

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (KDCC Bank Election) शाहुवाडी तालुका विकास संस्था गटातील रणवीर गायकवाड व प्रक्रिया संस्था गटातील संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर (Babasaheb Patil- Aarsulekar) यांचा विजय हा आमदार डॉ. विनय कोरे (Dr. Vinay Kore) यांना धक्का समजला जातो. ‘सासुसाठी भांडण केले आणि सासुच वाटणीला’ अशाची काहीशी अवस्था कोरे यांची या दोघांच्या विजयाने झाली आहे.

विनय कोरे यांनी सत्तारूढ पॅनेलमध्ये प्रक्रिया गटातून आसुर्लेकर यांना तीव्र विरोध केला होता. त्यांना घेणार असाल तर मी तुमच्यासोबत नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. कोरे यांच्या आक्रमक भुमिकेमुळे सत्तारूढ गटाचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे हतबल झाले होते, त्यातून त्यांनीआसुर्लेकर यांच्याऐवजी प्रदीप पाटील-भुयेकर यांना उमेदवारी दिली. पण या गटातून आसुर्लेकर यांनी सर्वाधिक मते घेऊन एकप्रकारे कोरे यांनाच शह दिला आहे.

विनय कोरे
नाहीतर, शाळांची संच मान्यता रद्द करणार...' जिल्हाधिकाऱ्यांचा शाळांना इशारा

शाहुवाडी तालुका विकास संस्था गटात कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे विद्यमान संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर उमेदवार होते. या गटात सत्तारूढ व विरोधकांत मैत्रीपूर्ण लढत जाहीर करण्यात आली होती. या राजकारणा शाहुवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी पेरीडकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचे पुत्र रणवीर यांच्या मागे ताकद लावली होती. या लढतीत रणवीर विजयी झाल्याने हा कोरे यांना मोठा धक्का समजला जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com