Shivendraraje Bhosale News : न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस संरक्षण घेऊन मार्केट कमिटीच्या माध्यमातून आम्ही भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला आहे. शेतकरी हितासाठी लवकरच येथे सुसज्ज असे मार्केट यार्ड श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने उभारणार आहोत. विकास कामांच्या नावाखाली खासदार गटाच्या नगरसेवकांना या जागेवर प्लॉटिंग करून पैसा कमवायचा आहे. या कार्यक्रमाला विरोध करून उदयनराजे सातारकरांपुढे उघडे पडले आहेत, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
संभाजीनगर येथील जागेत भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व मार्केट कमिटीचे पदाधिकारी आले होते. या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले,‘‘ आम्हाला कोणाशी वाद घालायचा नाही. मार्केट कमिटीचा जागेवर रितसर ताबा आहे. सुप्रिम कोर्टाकडून सगळे निकाल झाले आहेत. कोणाचा या जागेला विरोध आहे, त्यांनी कायदेशीर स्थगिती या प्रक्रियेवर दाखवावी.
केवळ केस दाखल असून पेंडिंग आहे, म्हणून स्थगिती देता येत नाही. याप्रकरणी संबंधितांना पोलिस अधीक्षक कार्यालयात यापूर्वी चर्चेला बोलावले होते, पण कोणीही आले नाही. मार्केट कमिटीच्या नावावर ही जागा असून, तेथे आम्ही हा कार्यक्रम करत आहोत.’’ त्यांची काय कागदपत्रे असतील तर ती पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून पाहावीत.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,‘‘ आम्ही बेकायदशीर काही केले असेल तर बाजार समितीवर कायदेशीर कारवाई करा. सर्व न्यायालयांचे निकाल होऊन मार्केट कमिटीच्या नावावर जागा करुन दिलेली आहे. शेतकऱ्यांना सुसज्ज मार्केट कमिटी व्हावी, मालाला योग्य दर मिळावा, व्यापाऱ्यांचा व्यापार वाढावा, उलाढाल वाढावी, पर्यायाने सातारा वाढेल या भावनेतून मार्केट कमिटीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करत आहोत.
ज्यांचा विरोध आहे, त्यांच्याबाबत आम्ही पोलिसांनाही सांगितले होते. त्यांच्याकडे कायदेशीर काही असेल तर दाखवावे. अन्यथा त्यांनी यामध्ये पडू नये. आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस संरक्षण घेऊन हा भूमिपूजनाचा कार्यक्रम केला आहे. लवकरच सुसज्ज असे मार्केट यार्ड श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने उभारणार आहोत.
शेतकरी हितासाठी या नियोजित जागेवर मार्केट कमिटीची नवीन सुसज्ज अशी इमारत होणार आहे. पण, विकास कामांच्या नावाखाली खासदार गटाच्या नगरसेवकांना या जागेवर प्लॉटिंग करून पैसा कमवायचा आहे.’’ या कार्यक्रमाला विरोध करून उदयनराजे सातारकरांपुढे उघडे पडले आहेत, असे सांगताच समर्थकांनी एक नेता एक आवाज बाबा महाराज... अशी घोषणाबाजी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.