Udayanraje Bhosale : माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना मोठं होता येत नाही; उदयनराजेंचा इशारा कुणाकडे

Udayanraje Bhosale News : 'आम्ही टप्याटप्प्याने पुढे जाणार...'
MP Udayanraje Bhosale Latest News
MP Udayanraje Bhosale Latest Newssarkarnama
Published on
Updated on

सातारा : कोण काय बोलले याकडे मी लक्ष देत नाही. प्रत्येकाची बुद्धी असते त्याप्रमाणे ते बोलतात. त्याला फारसे महत्व देत नाही. त्यांच्याबरोबर सरकारी, सहयोगी असतील. महाराष्ट्रात घडले त्याबाबत लोकांत जागृती केली पाहिजे. माझे नाव घेतल्याशिवाय काही लोक मोठी होऊ शकत नाहीत, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळून लगावला. दरम्यान, पक्षाने दखल घेतली नाही. लोकशाहीत मतदार हा राजा असतो. त्यामुळे लोकांनी त्यांची दखल घेतली तर अडचण होईल, असा इशाराही त्यांनी भाजपला (BJP) दिला. (Satara News)

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendrasinhraje Bhosale) उदयनराजेंच्या आंदोलनाची खिल्ली उडवत त्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करावे, असा सल्ला दिला होता. त्यावर खासदार उदयनराजे म्हणाले, ''आम्ही आंदोलन करत नाही. तसेच कोण काय बोलले याकडेही लक्ष देत नाही. प्रत्येकाची बुद्धी असते त्याप्रमाणे बोलतात. त्याला मी फारसे महत्व देत नाही. त्यांच्याबरोबर सरकारी, सहयोगीही असतील. पण महाराष्ट्रात जे घडले त्याबाबत लोकांत जागृती केली पाहिजे. माझे नाव घेतल्याशिवाय काही लोक मोठी होऊच शकत नाहीत'', असं ते म्हणाले.

MP Udayanraje Bhosale Latest News
भवानी तलवारीनंतर अफजलखानाचा कोथळा काढलेले वाघनखे महाराष्ट्रात येणार

इतका आवाज उठवूनही पक्षाकडून दखल घेतली जात नाही, तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ''लोकशाहीत मतदार हा राजा असतो. त्या कोणताही पक्ष मोठा होऊच शकत नाही. त्यांनी दखल घेतली नाही. पण, लोकांनी त्यांची दखल घेतली तर अडचण होईल. कोणत्याच पक्षाने दखल घेतली नाही, त्यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही टप्याटप्प्याने पुढे जाणार आहोत, असं उदयनराजे म्हणाले.

MP Udayanraje Bhosale Latest News
PM Narendra Modi : २०२४ च्या निवडणुकीसाठी मोदींचा नवा मंत्र; गावागावात जा आणि...

''जे घडलंय त्याविषयी लोकांना सांगितले पाहिजे. यात कोणतेही राजकारण नाही. पण, येथील लोकप्रतिनिधी म्हणतात राजकारण करत आहेत. छत्रपतींचा अवमान होत असेल या वाड्यात मलाच काय त्यांनाही व इतर कोणालाच राहण्याचा अधिकार नाही. घराण्याचे नाव लावतात, मात्र करणार काहीच नाहीत. जे काय राजकारण करायचे ते करु देत त्यांना. पण, आम्हाला लेाकांची सेवा आणि समस्या सोडवायच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) विचार घेऊनच वाटचाल करणार आहोत'', असे उदयनराजे (Udayanraje Bhosale) यावेळी ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com