नगरमध्ये कोरोनाची तिसरी लाट तीव्र : एकाच दिवसात 1432 रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना ( Corona ) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत.
Corona
Corona Sarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात कोरोना ( Corona ) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. कालपर्यंत एक हजारही नसलेली कोरोना रुग्णांची संख्या आज एकाच दिवसात एक हजार 432 झाली आहे. राजकीय नेते, शासकीय अधिकाऱ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोरोना विषाणू जिल्ह्यात स्वैर संचार करू लागला आहे. Third wave of corona intensifies in town: 1432 patients in a single day

मागील आठवड्याभरापासून अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण व थंडीची लाट आहे. या बदलत्या वातावरणाने शहरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. अशा सुमारे 6 हजारपेक्षाही जास्त रुग्णांची काल कोरोना विषयक चाचणी घेण्यात आली. यात एक हजार 432 जण कोरोना बाधित आढळून आले.

Corona
नगर जिल्ह्यातील सहाव्या मोठ्या राजकीय नेत्याला कोरोना

जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे नगर शहर व तालुक्यात आढळून आले आहेत. नगर शहरात 522 तर नगर तालुक्यात 119 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर कोरोना उपाययोजनाची अंमलबजावणी मोठे डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Corona
आमदार रोहित पवारांनी एकाच बाणात केले अनेक पक्षी घायाळ...

महापालिका प्रशासन सुस्त

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट नगर शहरातच पहिल्यांदा आली होती. मात्र तत्कालीन महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात प्रशासन यशस्वी ठरले होते. शिवाय महापालिकेने विविध सामाजिक उपक्रमही त्यावेळी राबविले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व तत्कालीन महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ठोस पावले उचलत पहिल्या लाटेत नगर शहर काही काळ कोरोना मुक्त करून दाखविले होते. मात्र सध्या कोरोना वाढत असताना महापालिका प्रशासन सुस्त असल्याचे दिसत आहे.

Corona
ही तर राम शिंदे यांची स्टंटबाजी : रोहित पवारांचा पलटवार

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या

नगर शहर - 522

नगर तालुका - 119

राहाता - 113

पारनेर - 109

श्रीरामपूर - 78

पाथर्डी - 73

नेवासे - 52

इतर जिल्ह्यातील - 49

अकोले - 48

संगमनेर - 48

कोपरगाव - 34

कर्जत - 34

राहुरी - 30

जामखेड - 28

शेवगाव - 27

श्रीगोंदे - 25

सैनिकी रुग्णालय - 20

भिंगार - 19

इतर राज्य - 4

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com