ही तर राम शिंदे यांची स्टंटबाजी : रोहित पवारांचा पलटवार

भाजपकडून ( BJP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर दडपशाहीचा आरोप होत आहे.
Ram Shinde, Rohit Pawar

Ram Shinde, Rohit Pawar

Sarkarnama

Published on
Updated on

कर्जत ( अहमदनगर ) : कर्जत नगर पंचायत निवडणूक प्रक्रियेत आमदार रोहित पवार ( Rohit Pawar )राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) दहशतीचे वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप भाजपकडून ( BJP ) केला जात आहे. तसेच भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडेही या बाबत तक्रार केली आहे. भाजपच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आज कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेतली. This is Ram Shinde's gimmick: Rohit Pawar's counterattack

दहशत, दडपशाहीच्या आरोपांना आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. यावेळी प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, शहराध्यक्ष सुनील शेलार, उद्योजक दीपक शिंदे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, ज्येष्ठ नेते प्रसाद ढोकरीकर आदी उपस्थित होते.

Ram Shinde, Rohit Pawar

आमदार रोहित पवार यांनी आपल्याच सरकारचे टोचले कान

आमदार रोहित पवार म्हणाले, कर्जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. लोकांच्या पाठबळामुळे नगरपंचायतीची सत्ता आम्हालाच मिळणारच आहे. या निवडणुकीत भाजपला खातेही उघडता येणार नाही, हे कळून चुकल्यानेच माजी मंत्री राम शिंदे यांनी केवळ स्टंटबाजी सुरू केली आहे. बेछूट आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. आम्हाला जनतेतून मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद पाहूनच भाजपच्या उमेदवारांनी माघार घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आम्ही त्यांचे स्वागत केले, त्यात आमची काय चूक, असा सवालही आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

Ram Shinde, Rohit Pawar

भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज माघारी : रोहित पवार समर्थकांनी खेळला गुलाल

ते पुढे म्हणाले, की कर्जत शहरात टपऱ्या हटविण्यासंदर्भात अपप्रचार सुरू आहे. मात्र, संबंधित टपरीधारकांसमवेत आम्ही बोललो आहोत. एकही टपरी जागची हलणार नाही. अन्य ठिकाणी भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार असून, टपरीधारकाला इच्छा असेल तर तेथे माफक दरात गाळा घेता येईल. शहरातील राजीव गांधी नगर, अक्काबाई नगर आणि यासीन नगरमधील सोळाशे घरे रहिवास असलेल्यांच्या नावावर केली जातील. त्यांना घरकुलेसुद्धा दिली जातील.

‘कुकडी’च्या पाण्याविषयी राम शिंदे चुकीचे बोलत आहेत. गेल्या दोन वर्षांत ते घराच्या बाहेरच पडले नाहीत. त्यामुळे पाणी कधी सुटले, हेच त्यांना कळाले नाही. गेल्या पंचवीस वर्षांत ‘कुकडी’च्या भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना पाच कोटी मिळाले. मात्र, आपण या दोन वर्षांत पुढाकार घेत 140 कोटी रुपये मिळवून दिले, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले

Ram Shinde, Rohit Pawar

राम शिंदे असे का वागत आहे, हे कळत नाही.. ; पाहा व्हिडिओ

शरद पवारांवर आरोप केले की नेते मोठे होतात

किरीट सोमय्या हे त्यांचे सततचे मुद्दे घेऊन बोलत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव घेऊन बोलले, आरोप केले, की नेते मोठे होतात. मात्र, केलेले आरोप सिद्ध होत नाहीत. केवळ बदनामीसाठी त्यांचा हा उद्योग चाललेला असतो. मात्र, जनता हुशार आहे, असे सांगून त्यांनी सोमय्यांचा आरोप खोडून काढला.

आमदार पवार यांनी सांगितले, की भाजपच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला, याचे उत्तर मी कसे देणार. एखाद्याने माघार घेत आम्हाला पाठिंबा दिला तर नाही कसे म्हणणार? उलट भाजपचे आणखी तीन उमेदवार माघार घेणार होते. मात्र, त्यांना वेळेत पोचता न आल्याने ते राहिले. इच्छा नसताना ते निवडणुकीत आहेत. यात कोणत्याही दडपशाहीचा अवलंब केला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com