Kolhapur News: हे फक्त कोल्हापूरात होऊ शकतं! जातीय दंगलीनंतर नागरिकांचा मोठा निर्धार

Hindu-Muslim Riots: कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी हिंदू-मुस्लिम समाजात दंगल घडविण्याचा प्रयत्न झाला.
Rajshree Shahu Salokha Manch
Rajshree Shahu Salokha ManchSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Latest News Update : कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी हिंदू-मुस्लिम समाजात दंगल घडविण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे पुढचे काही दिवस कोल्हापूरमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण होते. यामुळे कोल्हापूरच्या प्रतिमेला धक्का लागल्याची भावना जनतेकडून व्यक्त केली जात आहे. अशातच कोल्हापूरात यापुढे अशा अघटित घटना घडू नयेत, यासाठी शाहूप्रेमी नागरिक एकत्र आले आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरचा वारसा टिकविण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (५ जून) शिव-शाहू सद्भावना रॅली होणार आहे. (Kolhapur News)

Rajshree Shahu Salokha Manch
MP Sanjay Jadhav on Eknath Shinde : "शिंदे गटातल्या नेत्यांचे आजही फोन, भेटायचं म्हणतात.." ; ठाकरेंचे खासदार जाधव म्हणाले..

कोल्हापुरातील समाजिक ऐक्य आणि पुरोगामी विचार जपण्यासाठी ही शिव-शाहू सद्भावना फेरी काढण्याचा काढली जाणार आहे. अशी प्रतिक्रिया राजर्षी शाहू सलोखा मंचकडून देण्यात आली आहे. आज होणाऱ्या या शिव-शाहू सद्भावना फेरी आणि सभेची तयारी पूर्ण झाली आहे.त्यासाठी संपूर्ण शाहूनगरीतील अठरापगड जाती समाजातील घटकांच्या गाठी-भेटीही घेण्यात आल्या आहेत. (Kolhapur Riots)

इतकेच नव्हे तर, हिंदू-मुस्लिम समाजातील एकोपा कायम राखण्यासाठी अधिकाधिक संख्येने बांधवांनी फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहनही राजर्षी शाहू सलोखा मंचाकडून करण्यात आले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमधील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारकापासून या फेरीला सुरुवात होणार आहे. (Kolhapur Roits News Update)

Rajshree Shahu Salokha Manch
CM Siddaramaiah Maharashtra Visit: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; 'हे' आहे कारण?

विशेष म्हणजे, या फेरीसाठी खुद्द श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे देखील उपस्थित राहणार आहेत. सी. पी. आर रुग्णालय मार्गे छ. शिवाजी महाराज चौक अशी ही रॅली असेल. इथे पोहचल्यानंतर राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप होईल. राजर्षी शाहू सलोखा मंचचे अध्यक्ष वसंतराव मुळीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास ८० हून अधिक जाती समाजातील लोकांच्या भेटीगाठी घेत एकत्रित केले आहे. यासोबतच आचारसंहितेची माहिती सर्व घटकांपर्यंत पोहोचवली जात आहे. या रॅलीसाठी आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या एकतेची व सामाजिक सलोख्याची परंपरा दृढ करण्याचा निर्धार करत सर्व जाती-धर्मीयांची एकजूट देशाला दाखवली जाईल. रॅली केवळ तिरंगा व भगवा ध्वज असतील , शिवछत्रपतींसह राष्ट्रपुरुषांच्या घोषणा दिल्या जातील.राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पोस्टर्स झळकवले जातील, पण कोणत्याही प्रकारे चिथावणीखोर आणि जातीय विद्वेष पसरविणाऱ्या् घोषणा दिल्या जाणार नाहीत, याचीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, शिव-शाहूप्रेमींनी स्वत:च्या वाहनाने रॅलीत सहभागी व्हायचे आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com