Hasan Mushrif on Sharad Pawar : हे चाळीस वर्षात पहिल्यांदाच : पवारांच्या कोल्हापूर सभेवर मुश्रीफ भावूक

NCP Politics : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर मात्र मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडली.
Hasan Mushrif on Sharad Pawar :
Hasan Mushrif on Sharad Pawar :Sarkarnama

Kolhapur News : "माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील" असे जाहीरपणे वक्तव्य करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे चाळीस वर्षात पहिल्यांदाच त्यांच्यासोबत दिसणार नाहीत. पवारांचा असा कोणताच दौरा नाही, ज्या दौऱ्यात मुश्रीफ यांनी पवारांची साथ सोडलेली नाही. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर मात्र मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडली. आज शरद पवार यांची कोल्हापुरात सभा आहे. पण या सभेत मी नाही, याची खंत मुश्रीफांच्या चेहऱ्यावर सहज जाणवली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर मुश्रीफ भावूक झालेले पहायला मिळाले.

विचारलेल्या प्रश्नावर मुश्रीफ यांनी मनमोकळेपणाने कबुली दिली. हो हे खरे आहे. पवार साहेब आज कोल्हापुरात आहेत. पण मी त्यांच्यासोबत नाही. हे 40 वर्षानंतर पहिल्यांदाच घडतंय. परिस्थितीप्रमाणे आम्ही निर्णय घेतला आहे. का निर्णय घेतला? याचे विवेचन आम्ही वारंवार केले आहे. असे मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif on Sharad Pawar :
Supriya Sule on NCP Split : राष्ट्रवादीत फुट पडली की नाही ? सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं

अजित पवार आमचे नेते आहेत राष्ट्रवादीत गट नाहीत. अशी टिपणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीच केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी, मी त्यांच्या वक्तव्याचे स्वागत करतो. परमेश्वराच्या कृपेने ते खरे व्हावे. पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पवारांनी मन बना लीया है! असं म्हणत पवार साहेब आज कोल्हापुरात येणार आहेत. ते एनडीए सोबत येणार आहेत का? हे त्यांनाच विचारा, असेही मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांची आज कोल्हापुरात दसरा चौकात निर्धार सभा होत आहे. छत्रपती शाहू महाराज सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. राष्ट्रवादीतील बंडखोरी आणि त्यानंतर राज्यात झालेल्या घडामोडींवर आजच्या सभेतून शरद पवार कोणाकोणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com