Kolhapur Shivaji University: वेळ नकोय आता निर्णय हवा; शिवाजी विद्यापीठातील अधिसभेत 'अभाविप'चा गोंधळ

ABVP News: विविध मागण्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांचा सभागृहातच काही वेळ ठिय्या
Shivaji University
Shivaji UniversitySarkarnama

ABVP and Shivaji University: कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील सुरू असलेल्या अधिसभेत अचानक घुसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून 'स्टुडंट कौन्सिल'च्या निवडणुका झाल्याच पाहिजेत अशी घोषणाबाजी केली. काही वेळ तेथेच ठिय्या मांडला. यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळांची स्थिती निर्माण झाली होती.

शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) राजश्री शाहू सभागृहात अधिसभा बैठक सुरू होती. त्यावेळी दुपारी साडेबाराच्या सुमारास अभविपचे काही कार्यकर्ते अचनाकच सभागृहात घुसले. यावेळी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. तसेच विद्यार्थ्यांना, आत्महत्याग्रस्त प्राध्यापकांना न्याय द्या अशी मागणी केली. तसेच विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका कधी घेणार, असाही प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी विविध मागण्यांचे फलक घेऊन कुलगुरूंसमोर ठिय्या मांडला. यावेळी त्यांनी 'स्टुडंट कौन्सिल'च्या निवडणुका झाल्याच पाहिजे, वेळ नको आता निर्णय हवाय, अशी घोषणाबाजी केली. यावेळी विविध मागण्याही ABVP 'अभाविप'कडून करण्यात आल्या.

Shivaji University
NCP News; `राष्ट्रवादी`च्या दणक्याने राज्य सरकार पोहोचले थेट बांधावर!

दरम्यान, प्र कुलगुरू आणि कुलसचिव यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी अधिसभा बैठकीत बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल आणि पूर्वपरवानगी घेतली नसल्याने कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. तसेच १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता चर्चेचे निमंत्रण दिले. यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा देत सभागृह सोडले. दरम्यान, सुरक्षारक्षकांनीही कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना जुमानले नाही.

Shivaji University
Help For Bjp's Sugar Factories: राज्यातील सात भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मिळणार १०३१ कोटींचे कर्ज : हे आहेत नेते....

यावेळी आंदोलनकर्त्यांनी आत्महत्याग्रस्त प्राध्यापक यांच्या कुटुंबास योग्य ती आर्थिक मदत विद्यापीठाने करावी, विद्यापीठातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना कायम करून घेण्यासाठी राज्य शासनाकडे (State Government) पाठपुरावा करावा, तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीस जबाबदार अधिकऱ्यांवर कारवाई करावी, येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घ्याव्यात, विद्यापीठातील सर्व प्रभारी पद्धतीने भरलेली पदे कायमस्वरूपात भरावी, आदी मागण्या केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com