या वाक्यावरून तृप्ती देसाई पुन्हा संतापल्या : इंदुरीकर महाराजांवर गुन्ह्याची मागणी

कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज हे नव्या वादात अडकले आहेत.
Indurikar Maharaj
Indurikar MaharajSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्रात समाजप्रबोधनकार समजले जाणारे अहमदनगर जिल्ह्यातील कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज हे नव्या वादात अडकले आहेत. पुन्हा त्यांनी कोरोनावर ( Corona ) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर कारवाई व्हावी अशी सरकारकडे मागणी केली आहे. Trupti Desai got angry again with this sentence: Demand for crime against Indurikar Maharaj

इंदुरीकर यांनी काही दिवसांपूर्वी पूत्रप्राप्तीसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे. अशातच आता त्यांनी कोरोनासंसर्गाबद्दल वक्तव्य केले आहे. इंदुरीकर महाराज म्हणाले की, मी माळकरी असल्याने मला कोरोना होणार नाही मात्र माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारच, असे वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकरांनी कीर्तनातून केले. मात्र अशा वक्तव्याने ते समाजात अंधश्रद्धा पसरवत असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

Indurikar Maharaj
इंदुरीकर महाराज, `तारतम्य ठेवा, नाही तर गयावया करीत पळत फिरावे लागेल`

तृप्ती देसाई म्हणाल्या की, मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारचं असे सांगून कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत. कोरोना ही महाभयंकर महामारी असून सध्या तिसरी लाट आपल्या देशात आहे. याआधी अनेक जणांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत.

त्यांनी पुढे म्हटल्या आहे की, सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी ठेवलेल्या प्रवचनाला इंदुरीकर यांना बोलविले जाते आणि गर्दी जमा होते, आता लवकरच निवडणुका आहेत केवळ म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो. या आधी सुद्धा त्यांच्या कोरोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई न करता सूट दिली होती परंतु हिम्मत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तरच या सरकारने इंदुरीकरांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे असे जनतेला वाटेल, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

Indurikar Maharaj
इंदुरीकर महाराज आमदार लंके यांच्या पाठीशी, म्हणाले...

ही त्यांची वादग्रस्त वक्तव्ये

इंदुरीकर महाराज हे कीर्तनात विनोदाद्वारे समाज प्रबोधन करतात. मात्र काही वेळेला त्यांचे हेच विनोद त्यांच्या अंगलट आल्याचेही दिसून येते आहे. त्यांनी या पूर्वी पूत्रप्राप्ती संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्या विरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समितीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ते प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे. कोरोना लसीकरणाबाबतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या संदर्भातही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com