Karad Politic's : कऱ्हाड नगरपालिकेत सख्खा भावांची एन्ट्री; एक नगराध्यक्ष, तर दुसरा नगरसेवक!

Nagar Parishad Election 2025 : कऱ्हाड नगरपालिकेच्या निवडणुकीत सख्या भावांनी विजय मिळवत राजकीय चर्चा रंगवली असून इतर कुटुंबीय उमेदवारांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला.
Rajendra Yadav-Vijay Yadav
Rajendra Yadav-Vijay YadavSarkarnama
Published on
Updated on
  1. कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत दोन पिता-पुत्र आणि दोन सख्या भावांनी निवडणूक लढवली, त्यात यादव बंधूंनी दुहेरी यश मिळवले.

  2. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे सख्खे बंधू विजयसिंह यादव दोघेही विजयी होऊन नगरपालिकेत प्रवेश करणार आहेत.

  3. पावसकर व शिकलगार पिता-पुत्रांमध्ये संमिश्र निकाल लागला, तर यादव बंधूंचा विजय चर्चेचा विषय ठरला आहे.

Karad, 23 December : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत दोन पिता-पुत्र आणि दोन सख्या भावांनी नशिब अजमावले. यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे सख्खे बंधू विजयसिंह यादव या दोघा बंधूंनीच विजय मिळवित कऱ्हाड नगरपालिका एन्ट्री केली आहे.

भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि त्यांचे पुत्र अजय पावसकर हे नगरसेवकपदासाठी, लोकशाही आघाडी व यशवंत आघाडीचे नगरसेवकपदाचे उमेदवार अल्ताफ शिकलगार आणि त्यांचे पुत्र शाहरुख शिकलगार हे काँग्रेसकडून नगरसेवकपदासाठी तर लोकशाही आघाडी व यशवंत आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे बंधू विजय यादव हे नगरसेवकपदासाठी उभे होते.

त्यात राजेंद्रसिंह यादव आणि विजयसिंह यादव या सख्या भावांनी विजय मिळवून ते कऱ्हाड नगरपालिकेत इन्ट्री करणार आहेत, त्यामुळे त्याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कऱ्हाड नगरपालिकेची निवडणूक या वेळी वेगळ्या पॅटर्नने लढवण्यात आली. मागील निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी एकत्रित येत आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती.

या वेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यांचे कॉंग्रेसच्या चिन्हावर उमेदवार उभे केले, तर माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी एकत्रित येत लोकशाही-यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे केले होते. भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कमळाच्या चिन्हावर उमेदवार उभे केले होते.

Rajendra Yadav-Vijay Yadav
NCP leader kidnapping : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला भररस्त्यातून उचललं ; अपहरण करून बेदम मारहाण; थरार 'सीसीटीव्हीत' कैद

कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत यावेळी पावसकर व शिकलगार पिता-पुत्र तर यादव बंधू यांनी उमेदवारी घेऊन जनतेचा कौल आजमवला. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर यांनी आणि त्यांचे पुत्र अजय पावसकर यांनी प्रभाग सातमधून निवडणूक लढवली. त्यात विनायक पावसकर यांचा पराभव झाला तर त्यांचे पुत्र अजय पावसकर हे नगरसेवक म्हणून निवडून आले.

लोकशाही आघाडी व यशवंत आघाडीचे नगरसेवकपदाचे उमेदवार अल्ताफ शिकलगार यांनी प्रभाग सहामधून, तर त्यांचे पुत्र शाहरुख शिकलगार यांनी काँग्रेसकडून प्रभाग 12 मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली. त्यात अल्ताफ शिकलगार विजयी झाले तर त्यांचे पुत्र शाहरुख शिकलगार यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

लोकशाही आघाडी व यशवंत आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे बंधू विजय यादव हे प्रभाग 12 मधून नगरसेवकपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात राजेंद्रसिंह यादव आणि विजयसिंह यादव या सख्ख्या भावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे राजेंद्रसिंह यादव आणि विजय यादव हे दोघेही सभागृहात असतील. या दोन्ही बंधूंचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Rajendra Yadav-Vijay Yadav
Sindhudurg News : सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या चर्चांना पूर्णविराम? राणे विरुद्ध राणे वादाचा दुसरा पार्ट जिल्हा परिषेदत दिसणार!

प्र.1: कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत कोणते कुटुंब चर्चेत आले?
उ: यादव बंधूंनी दोघांनीही विजय मिळविल्याने ते सर्वाधिक चर्चेत आले.

प्र.2: कोणत्या पिता-पुत्रांना संमिश्र निकाल मिळाला?
उ: विनायक पावसकर पराभूत झाले तर त्यांचे पुत्र अजय पावसकर विजयी झाले.

प्र.3: शिकलगार पिता-पुत्रांचा निकाल काय लागला?
उ: अल्ताफ शिकलगार विजयी झाले, तर त्यांचे पुत्र शाहरुख शिकलगार पराभूत झाले.

प्र.4: या निवडणुकीतील खास बाब कोणती ठरली?
उ: एकाच कुटुंबातील सख्ख्या भावांनी एकत्र विजय मिळवणे ही निवडणुकीतील ठळक बाब ठरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com