स्ट्रॉबेरी, आले संशोधन केंद्रासाठी उदयनराजेंची केंद्रीय कृषीमंत्र्याशी चर्चा...

राज्यातील कृषी विषयक प्रश्नांवर State Agri issues खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर Narendra sinh Tomar यांची दिल्ली Delhi येथे भेट घेतली.
Udayanraje Bhosale, Narendra Sinh  Tomar
Udayanraje Bhosale, Narendra Sinh Tomarsarkarnama
Published on
Updated on

सातारा : नैसर्गिक आपत्तीच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आधार देण्याची गरज आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील स्ट्रॅाबेरी, हळद, आले उत्पादक शेतकऱ्यासाठी संशोधन केंद्र उभारणीची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे केली आहे.

राज्यातील कृषी विषयक प्रश्नांवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची दिल्ली येथे भेट घेतली. तसेच यावेळी कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन केंद्र विकसित करणे, कृषि यंत्र उपलब्ध करून देणे यासह अनेक मुद्द्यांवर तसेच सातारा जिल्ह्यातील कृषि विषयक अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

Udayanraje Bhosale, Narendra Sinh  Tomar
Video: राष्ट्रवादीत परत जाणार का? उदयनराजे यांनी दिले हे उत्तर

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यानां केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आधार देण्याची गरज आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील स्ट्रॅाबेरी, हळद, आले उत्पादक शेतकऱ्यासाठी संशोधन केंद्र उभारणीची गरज आहे. जेणेकरून या उत्पादनास चालना मिळेल. त्यासाठी केंद्रातून विशेष निधी उपलब्ध करण्याचा आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे.

Udayanraje Bhosale, Narendra Sinh  Tomar
सोमय्यांवरील हल्ल्याबाबत उदयनराजे म्हणाले, ही तर झुंडशाहीची नांदी...

राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन होत असताना त्याची तोडणी करणे शेतकऱ्यांसाठी अडचणीची होत आहे. त्यासाठी ऊस तोडणी यंत्राची गरज आहे. या मशिनची किमती सामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नसल्यामुळे केंद्राने यासाठी अनुदान देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पूर्वी ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान मिळत होते. मात्र, हे अनुदान बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, ही बाबही उदयनराजेंनी निदर्शनास आणून दिली.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने याकडे लक्ष द्यावे.

Udayanraje Bhosale, Narendra Sinh  Tomar
महामार्गाच्या संथगतीच्या कामांवरून उदयनराजे संतप्त; महामार्गाच्या अधिकाऱ्यांना ठणकावले...

सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेवून कृषी मंत्रालयने विविध योजना तसेच संशोधन केंद्रे निर्माण करणे आवाश्यक आहे. विशेषत: कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यानां मार्गदर्शन होणे गरजे आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात स्ट्रॅाबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे स्ट्रॅाबेरीवर संशोधन करणारे एक केंद्र उभारण्यासाठी तसेच हळद संशोधन केंद्र आणि आले संशोधन केंद्र उभारणीसाठी मान्यता देऊन त्यास निधी उपलब्ध करावा, अशी मागणी उदयनराजेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com